सरकारविरोधात भूमिका घेणं पडलं महागात; 'नोबेल' विजेते बिलियात्स्कींना 10 वर्षांचा तुरुंगवास!

बेलारूसबेलारूसचे नोबेल शांतता पुरस्कार विजेते आणि मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस बिलियात्स्की  यांना स्थानिक न्यायालयानं 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीये.सरकारविरोधातील आंदोलनांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलंय. ऑक्‍टोबर 2022 मध्ये मानवी हक्कांचा प्रचार करण्‍यासाठी अॅलेस यांना नोबेल शांतता पारितोषिक प्रदान करण्यात आलं होतं. अॅलेस यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की, 'बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को  यांचं सरकार त्यांना जबरदस्तीनं गप्प करण्याचा प्रयत्न करत आहे.'

बिलियात्स्की यांना 10 वर्षांची शिक्षा

60 वर्षीय अॅलेस बिलियात्स्की यांना सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणं, आंदोलकांना निधी देणं यासाठी ही शिक्षा सुनावण्यात आलीये. नोबेल पारितोषिक विजेत्याशिवाय आणखी तीन जणांना सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी निधी दिल्याबद्दल शिक्षा झालीये. 2020 मध्ये झालेल्या निदर्शनांनंतर सरकारनं चौघांना अटक केली होती. हे सर्वजण बेलारूसचे अध्यक्ष म्हणून अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या निवडीला विरोध करत होते.राजकीय सुडातून कारवाई

अॅलेस यांच्याविरुद्ध ही कारवाई राजकीय सुडातून केल्याचा आरोप अधिकार गटानं केला आहे. त्याच वेळी, निर्वासित बेलारशियन विरोधी पक्षनेत्या स्वेतलाना सिखानौस्काया यांनी अॅलेस यांचं समर्थन केलं. 'सर्वांना चुकीच्या पद्धतीनं दोषी ठरवण्यात आलंय, हा निकाल धक्कादायक आहे.' सरकारी वकिलांनी मिन्स्क कोर्टाला  बिलियात्स्की यांना 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यास सांगितलं होतं, परंतु न्यायालयानं हा आरोप लक्षात घेऊन त्यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच त्यांना US$ 65,000 चा दंड ठोठावण्यात आलाय.

बिलियात्स्कींना 2022 मध्ये मिळाला 'नोबेल'

वेस्ना मानवाधिकार केंद्राचे प्रमुख अॅलेस बिलियात्स्की आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर विरोधी निदर्शनं, मनी लाँड्रिंगला वित्तपुरवठा केल्याचा आरोप आहे. बिलियात्स्की यांना ऑगस्ट 2011 मध्ये ताब्यात घेण्यात आलं आणि नोव्हेंबर 2011 मध्ये करचुकवेगिरीसाठी 4.5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.TASS च्या अहवालानुसार, जून 2014 मध्ये बिलियात्स्की यांची शिक्षा संपण्यापूर्वी सोडण्यात आलं. ऑक्टोबर 2022 मध्ये नॉर्वेजियन नोबेल समितीनं अॅलेस बिलियात्स्की यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान केलाय. वेस्ना प्रतिनिधी बिलियात्स्की यांच्यासह व्हॅलेंटिन स्टेफानोविच आणि व्लादिमीर लॅबकोविच यांनाही दोषी ठरवण्यात आलं होतं, त्यांना अनुक्रमे 9 आणि 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तर, दिमित्री सोलोव्हियोव्ह यांना आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयानं प्रत्येकाला अंदाजे USD 40,000 चा दंड ठोठावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने