'या' दोन गावांत १५० वर्षांपासून साजरी होत नाही होळी, जाणून घ्या काय आहे कारण?

छत्तीसगड होळीचा सण उद्यावर आला आहे. यावर्षी रंग खेळण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. अनेकांनी त्यासाठी तयारीही सुरू केली आहे. पण, भारतात असे दोन जिल्हे आहेत त्यातील गावात गेल्या १५० वर्षांपासून होळीच खेळली गेली नाहीये.छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात ही दोन गावं वसलेली आहेत. या गावात होळीच्या दिवशी गोडधोड केले जाते पण होलिका दहन आणि गुलाल खेळला जात नाही.जिल्ह्यातील पहिले गाव खरहरी हे कोरबा जिल्ह्यापासून ३५ किलोमीटर दूर आहे. ते मां मडवारानी मंदिराच्या जवळ असलेल्या डोंगराखाली वसलेले आहे. या गावात गेल्या १५० वर्षांपासून होळी न खेळण्यामागे गावातले वडिलधारे व्यक्ती सांगतात की, त्यांच्या जन्माच्या आधीपासूनच गावात होळी न खेळण्याची प्रथा आहे. या गावात ६५० ते ७५० लोकं राहतात.

गावातल्या लोकांचे झाले नुकसान

गावातल्या वडिलधाऱ्या व्यक्तींच्या मते, अनेक वर्षांपूर्वी गावात मोठी आग लागली होती. गावातील परिस्थिती बिकट झाली होती. त्यानंतर गावात साथीचा आजार सुरू झाला होता. त्यामुळे गावातील लोकांचे मोठे नुकसान झाले होते.अशावेळी गावातील एका बैगा (हकीम) च्या स्वप्नात देवी मॉं मदवरानी आली. तिने या बैगाला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिला. गावात होळीचा उत्सव कधीही साजरा करू नका, तरच गावात शांतता नांदेल, असा उपाय देवीने दाखवला.त्यानंतर गावात कधीही होळी साजरी झालेली नाही. गावकऱ्यांनी सांगितले की इथे होलिका दहन होत नाही, तसेच रंगही उडवला जात नाही. पण, गोड-धोड मात्र केले जाते.दुसऱ्या गावात जाऊन खेळतात होळी

नियम तोडून रंग गुलाल खेळल्यास त्यांच्यावर देवीचा प्रकोप होतो. ते आजारी पडतात, असे आजही लोकं मानतात. त्यांच्या चेहऱ्यावर-शरीरावर मोठ्या प्रमाणात फोड येतात. पूजा केल्यावरच त्रास कमी होते. त्यामुळे गावातील सर्व वयोगटाचे लोकं नियम पाळतात.पण आता ही परंपरा बघता गावातील लोकं दुसऱ्या गावात जाऊन होळी खेळायला लागले आहेत. नवीन लग्न झालेल्यास मुली या काळात माहेरी जाणं पसंत करता. मुलांनाही होळी खेळण्याची भिती वाटत असल्याने ते खेळत नाहीत, असे शिक्षक सांगतात.

दुसऱ्या गावातही अशीच स्थिती

जिल्ह्यातील दुसरे गाव धामणगुडी आहे. ते कोरबापासून 20 किमी अंतरावर आहे.तर, मदवरानीपासून फक्त 5 किमी अंतरावर आहे. या गावातही होलिका दहन गेल्या दीडशे वर्षांपासून झालेले नाही. या गावातही एक आख्यायिका आहे की होळी खेळल्याने गावातील देव कोपतात. दोन्ही गावांचे अंतर अवघे ६ किमी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने