न्यायाधीशांवर टीका करणं भोवलं; 'या' Gymnastic प्रशिक्षकावर दोन वर्षांची बंदी!

रशिया: ऑलिम्पिकमधील निर्णयांवर टीका केल्याबद्दल इरिना व्हिनर या रशियन जिम्नॅस्टिक प्रशिक्षकावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आलीये.इरिना यांच्या शिष्यांनी अनेक ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत. न्यायाधीशांच्या निर्णयांमुळं टोकियो ऑलिम्पिकमध्ये सलग पदक जिंकण्याची रशियाची घोडदौड संपुष्टात आली. यामुळं त्या संतप्त झाल्या होत्या.त्यानंतर जिम्नॅस्टिक फाऊंडेशननं  असा निर्णय दिला की, ‘इरिनाला दोन वर्षे आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षक किंवा कोणतंही पद भूषवता येणार नाही.’टोकियो ऑलिम्पिकमध्ये  रशियन जिम्नॅस्ट्सनी वैयक्तिक आणि सांघिक अष्टपैलू स्पर्धांमध्ये रौप्य पदकं जिंकली. याआधी सिडनी ऑलिम्पिकपासून  रशियन जिम्नॅस्ट या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकत आहेत. इरिना म्हणाल्या, न्यायाधीश हे रशियन विरोधी आहेत आणि हे अत्यंत अपमानास्पद आहे. माझा एका अधिकाऱ्याशी वाद झाला आहे, असं त्यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने