येडियुरप्पा हरवले प्लॅस्टिक पिशव्यांच्या वावटळीत! लँडिंगच्या शेवटच्या क्षणी पायलटनं बदलला निर्णय

कलबुर्गी : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरला लँडिंगवेळी मोठी दुर्घटना होता होता टळली. त्यामुळं येडियुरप्पा थोडक्यात बचावले आहेत.कलबुर्गी येथील जेवारगी इथं सोमवारी हा प्रकार घडला. या धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहेयेडियुरप्पा यांचं हेलिकॉप्टर लँड करत असताना शेवटच्या क्षणी पायलटनं आपला निर्णय बदलला आणि ते पुन्हा हवेत झेपावलं.कारण हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरत असताना आजुबाजाला असलेल्या कचरा पंख्याच्या हवेमुळं हवेत पसरला यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा समावेश होता. त्यामुळं पायलटची व्हिजिबलिटी कमी झाली होती.दरम्यान, या हेलिपॅडच्या बाजुचा सर्व कचरा आणि माती पोलिसांनी साफ करावी लागली. त्यानंतरच हेलिकॉप्टर पुन्हा हेलिपॅडवर सुखरुप उतरवण्यात आलं.कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यापार्श्वभूमीवर आज तिथं मोदी येणार होते, त्यासाठी येडियुरप्पा आपल्या कामासाठी कलबुर्गी इथं आले होते. या ठिकाणी निघणाऱ्या जन संकल्प यात्रेत ते सहभागी होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने