हृतिक,रणवीर,कार्तिक की यश? 'ब्रह्मास्त्र 2' मधील 'देव' कोण साकारणार..अयाननं केला खुलासा

मुंबई: अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट,मौनी रॉय आणि अमिताभ बच्चन अभिनित 'ब्रह्मास्त्र' सिनेमा ९ सप्टेंबरला रिलीज झाला होता. सिनेमाला प्रेक्षकांनी खूप पसंतही केलं होतं आणि बॉक्सऑफिसवर सिनेमानं चांगली कमाईही केली होती.सिनेमाच्या ओटीटी रिलीजनंतर हे तर स्पष्ट झालं होतं की अमृता/जल अस्त्र च्या भूमिकेत दीपिका पदूकोण होती,पण देवच्या भूमिकेत कोण हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. अशात 'ब्रह्मास्त्र पार्ट २' मधील देव च्या भूमिकेविषयी दिग्दर्शक अयान मुखर्जीनं एक महत्त्वाची गोष्ट समोर आणली आहे.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अयान मुखर्जीनं ब्रह्मास्त्र २ विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ब्रह्मास्त्र २ च्या रीलिज संदर्भात अयान म्हणाला,''आम्ही सिनेमावर काम करत आहोत आणि याचा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा १०० टक्के अधिक चांगला असेल. आता पुन्हा आम्ही पार्ट २ साठी जर १० वर्ष लावली तर कोणीही हा सिनेमा पहायला जाणार नाही. आम्ही याला २ वर्षातच पूर्ण करणार आहोत''.अयानच्या वक्तव्यावरनं हे तर स्पष्ट झालं की पुढील २ वर्षात 'ब्र्ह्मास्त्र पार्ट २:देव' रिलीज केला जाईल.ब्रह्मास्त्र २ मध्ये देव च्या भूमिकेसाठी हृतिक रोशन,रणवीर सिंग,यश आणि कार्तिक आर्यन अशी नावं समोर आली आहेत. याविषयी जेव्हा अयानला विचारलं गेलं तेव्हा तो म्हणाला,''आता या प्रश्नावर माझ्याकडे काहीच उत्तर नाही. आपल्या सगळ्यांना यासाठी वाट पहावी लागेल. देव ही व्यक्तिरेखा दुसऱ्या भागासाठी खूप महत्त्वाची आहे.'''पहिल्या भागात याच्या काही झलक पहायला मिळाल्या होत्या. पण देवच्या चेहऱ्याला मात्र समोर आणलं नव्हतं. सिनेमात शाहरुख खान आणि नागार्जुनच्या कॅमियो ला देखील प्रेक्षकांनी पसंत केलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने