महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला अभिवादन करत नक्षत्रांचे देणे पुन्हा सेवेत! पुण्यात रंगणार मैफिल

पुणे: झी मराठीवर गाजलेला कार्यक्रम म्हणजे नक्षत्रांचे देणे. नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. महाराष्ट्रातील लाडक्या व्यक्तिमत्त्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगीतिक आदरांजली दिली जाते.हाच झी मराठीवरचा गाजलेला कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या सेवेत येणार आहे. नुकताच नक्षत्रांचे देणे मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाल्याने सर्वांना उत्सुकता आहे. महाराष्ट्रातील लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांना या कार्यक्रमच्या माध्यमातून आदरांजली दिली जाणार आहे.याशिवाय यंदा हा कार्यक्रम टीव्ही वर पाहण्याआधी प्रेक्षकांना याची देही याची डोळा पाहता येणार आहे.21 मार्च 2023 रोजी संध्या. 7 वाजता हा कार्यक्रम पुण्यात रंगणार असून पंडित फार्म्स, ४७/१, डी.पी.रोड, कर्वे नगर, पुणे- ४११०५२ या ठिकाणी नक्षत्रांचे देणे कार्यक्रमाँची खुमासदार मैफिल रंगणार आहे.यंदा नक्षत्रांचे देणे कार्यक्रमात कोणते कलाकार सहभागी असणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. आता पुणेकरांसाठी २१ मार्चला नक्षत्रांचे देणे पाहण्याची विशेष पर्वणी मिळाली आहे, यात शंका नाही.नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमाचे आजवर अनेक कलाकारांनी गायन, निवेदन केले आहे. अमृता सुभाष, सुनील बर्वे, रवींद्र साठे, सोनाली कुलकर्णी अशा अनेक कलाकारांनी आणि गायकांनी या कार्यक्रमात रंगत निर्माण केली आहे.आता नवीन भागात कोणते कलाकार आणि गायक सहभागी असणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने