'आम्ही सत्तेत आल्यावर...', कर्नाटक काँग्रेस अध्यक्षांचा थेट डीजीपींना इशारा

बंगळुरू: कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांना अटक करण्याची मागणी केली आहे. डीजीपी सत्ताधारी भाजप सरकारचा बचाव करत आहेत आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि त्यांना अटक झाली पाहिजे. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना हटवावे, असंही शिवकुमार यांनी म्हटलं.सूद यांच्या सेवेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. किती दिवस ठेवायचे आणि त्यांची पूजा करायची आहे? ते फक्त काँग्रेसवर गुन्हे दाखल करत आहेत. त्यांनी आमच्यावर २५ हून अधिक गुन्हे दाखल केल्याचा दावा शिवकुमार यांनी केला.दरम्यान आम्ही पुन्हा सत्तेत आल्यास त्यांच्यावर कारवाई करू, असही कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले. मे २०२३ पूर्वी २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेची निवडणूक होणार आहे.२२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत स्पष्ट बहुमताने सत्तेवर येण्यासाठी काँग्रेसने किमान १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जेडीएसने ९३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी भाजप आणि काँग्रेसने अद्याप आपली यादी जाहीर केलेली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने