'दुर्दैवाने मी खासदार आहे...', राहुल गांधी लाईव्ह पत्रकार परिषदेत बोलताना चुकले

दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लाईव्ह पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी दुर्दैवाने मी खासदार आहे असं म्हणाले तेवढ्यात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गांधींना टोकलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.राहुल गांधी यांची बोलताना झालेली चुक कॅमेरामध्ये कैद झाली आहे. मी दुर्दैवाने खासदार आहे, असं राहुल गांधी या पत्रकार परिषदेत म्हणाले, यानंतर जयराम रमेश यांनी राहुल गांधींना मध्येच टोकलं आणि त्यांना हे वक्तव्य सुधारायला सांगितलं.नेमकं काय घडलं लाईव्ह पत्रकार परिषदमध्ये?

राहुल गांधींने केलेलं वक्तव्य कॅमेरामध्ये कैद झालं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.'दुर्दैवाने मी एक खासदार आहे आणि मला संसदेत बोलायला दिलं जाईल, त्यामुळे सगळ्यात आधी मी संसदेच्या पटलावर माझं म्हणणं मांडेन आणि त्यानंतर तुमच्याशी चर्चा करेन, तसं झालं तर मला आनंद होईल,' असं राहुल गांधी म्हणाले.यानंतर लगेच जयराम रमेश यांनी राहुल गांधींना थांबवलं. 'दुर्दैवाने मी खासदार आहे, असं तुम्ही म्हणालात, यावरून तुमचा विनोद केला जाईल,' असं जयराम रमेश राहुल गांधींना म्हणाले.

त्यानंतर लगेच राहुल गांधींनी आपला शब्द फिरवला. 'मी स्पष्ट करू इच्छितो की मी दुर्दैवाने तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, कारण आरोप संसदेमध्ये 4 मंत्र्यांनी केले आहेत आणि मला उत्तर द्यायची संधी देणं हा माझा लोकतांत्रिक अधिकार आहे. जर भारताचं लोकतंत्र काम करत असेल तर मी माझी बाजू संसदेत मांडू शकेन,' अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.राहुल गांधी पत्रकार परिषदेत इंग्रजीमध्ये बोलत होते, तेव्हा त्यांच्या एका बाजूला केसी वेणुगोपाल आणि दुसऱ्या बाजूला जयराम रमेश बसले होते. राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून भाजपने टीका केली आहे, त्यावर राहुल गांधींना प्रत्युत्तर द्यायचं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने