रेल्वे स्टेशनच्या डिस्प्लेवर लागले 'जय श्री राम'चे नारे

सुरत  आयोध्या येथील राम मंदिराचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी १ जानेवारी २०२४ ला हे मंदीर भाविकांसाठी खुले होणार असल्याचं सांगितलं आहे. तर सुरत येथे रेल्वे स्टेशनच्या डिस्प्लेवर 'जय श्री राम'चे नारे दिसल्याने सध्या चर्चांना उधाण आलं आहे.सदर व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल झाला असून अलिशा खान यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये जय श्री राम, धर्मो रक्षती रक्षित:, एक ही नारा एक ही नाम अशी वाक्य दिसत आहेत. त्यामुळे सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.दरम्यान, रेल्वेमध्ये नमाज पठण करण्याऱ्यावर कारवाई होते पण एका धर्मासाठी एक नियम आणि दुसऱ्या धर्मासाठी एक नियम कसा असा प्रश्न हा व्हिडिओ शेअर करताना उपस्थित करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने