'कंगना आणि तुझ्यातलं वॉर संपेल का कधी?', उत्तर देत तापसी पन्नूनं सर्वांनाच केलं हैराण..

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या प्रोफेशनल लाइफसोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत आलेली पहायला मिळते. तापसी पन्नू तिच्या दमदार अभिनयाव्यतिरिक्त अनेकदा इतरही काही वादग्रस्त मुद्द्यामुळे चर्चेत येते.काही दिवसांपूर्वी तापसीचं कंगनासोबत देखील वाजलं होतं. ज्याची खूप चर्चा देखील रंगली होती. अशामध्ये तापसीनं आता एका मुलाखतीत कंगना संबंधित विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे.तापसीनं नुकतंच लल्लनटॉप या पोर्टलसोबत संवाद साधताना कंगनावर रिअॅक्शन दिली आहे. कंगना जेव्हा आपल्याला तिची स्वस्तातली कॉपी म्हणून गेली होती तेव्हा मी खूप हैराण झाले होते असं तापसी म्हणाली.'कधी तापसी कंगनासोबत बातचीत करेल का?' या प्रश्नावर तापसी म्हणाली,''खरं सांगू तर मला याविषयी आता बोलता येणार नाही..कारण माहित नाही त्यावेळी मी कसं वागेन. कारण याचा विचार मी कधीच केला नाही''.'' पण जर कधी अशी परिस्थिती निर्माण झाली ज्यात ती माझ्या समोर असेल..तर मी जाऊन हॅलो नक्कीच म्हणेन. मला तिच्याशी बोलण्यात अडचण काहीच नाही..तिला अडचण आहे..तेव्हा ती तिची मर्जी..बोलावं की नाही ते''.तापसी आणि कंगनातला हा वाद २०२० मध्ये झाला. २०२० मध्ये तापसी पन्नूला कंगनानं 'सस्ती कॉपी' म्हणत हिणवलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर तापसी आणि कंगना दरम्यान तुंबळ युद्ध रंगलं होतं.

जोरदार शाब्दिक वार दोघी एकमेकींवर करताना दिसल्या. पण नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कंगनाच्या 'सस्ती कॉपी' कमेंटवर बोलताना तापसीनं याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणून घेतलंय..असं अभिनेत्री म्हणाली.तापसी पन्नूनं आपल्या सिनेमांच्या माध्यमातून दमदार अभिनय करत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. तापसी काही दिवसांपूर्वीच आपल्याला 'ब्लर' सिनेमात दिसली होती. ज्याला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं होतं.तापसीच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचं झालं तर तिच्याजवळ 'हसीन दिलरुबा २' हा सिनेमा आहे,ज्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. तर तापसी लवकरच शाहरुखच्या 'डंकी' सिनेमातही दिसणार आहे.राजकुमार हिरानी 'डंकी'चं दिग्दर्शन करत आहेत. आणि पहिल्यांदा तापसी पन्नू शाहरुखसोबत काम करताना दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने