नाना पटोलेंना पुन्हा धक्का; राज्यातील 22 काँग्रेस पदाधिकारी हायकमांडच्या भेटीला

मुंबई: कॉंग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकी दरम्यान तांबे थोरात आणि पटोले यांच्यातील वादाचे पडसाद थेट दिल्ली दरबारी हायकमांडपर्यंत उमटले आहेत. आता पुन्हा एकदा काँग्रेसमधील दुफळी स्पष्टपणे समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात राज्यातील 22 काँग्रेस पदाधिकारी हायकमांडच्या भेटीला जाणार आहेत. त्यामुळे चर्चेला उत आला आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील पक्षांतर्गत असंतोष पुन्हा उफाळून आला आहे. पटोलेविरोधातील नाराज गट आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटणार आहेत. यात काँग्रेसचे २ माजी खासदार, ४ माजी आमदार दिल्लीकडे रवाना झाले आहेत.



मराठवाड्यातील पटोले यांच्याविरोधातील असंतुष्ट गट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि वेणूगोपाल यांची दिल्ली दरबारी भेट घेणार आहेत. यावेळी पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी हा गट करणार असल्याची माहिती आहे.त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार, नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेंलं आहे.काँग्रेसमधील अनेक नेते हे नाना पटोल यांच्या कामावर नाराज असल्याचं चित्र आहे. मागील महिन्यातही पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा अशी मागणी करण्यात आली होती. काँग्रेसमधील 21 नेत्यांनी निरीक्षक रमेश चिन्निथाला यांची भेट घेत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.नाना पटोले यांच्यामुळे पक्षात गटबाजीला सुरुवात झाली. नाना पटोले यांची पक्षात मनमाणी सुरू आहे. काँग्रेसमध्ये नानागिरी सुरू करणार असं ते म्हणतात. ते कोणाचचं ऐकत नाहीत. असे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने