अंगणवाडी सेविकांसाठी मोठी बातमी; मानधनात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई: अंगणवाडी सेविकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. आज प्रश्नोतरच्या तासात अंगणवाडी सेविकांचा विषय होता. जवळपास 100 सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. 100 सदस्य प्रश्न उपस्थित करून देखील मंत्री बघू बघू म्हणत असतील हे योग्य नाही. ज्या घोषणा तोंडी केल्या जातायत त्याची सरकार अंमलबजावणी करत नाहीत. असा आरोप करत विरोधकांनी आक्रमक भूमिका मांडली.
दरम्यान, महिला बालकल्याण विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली आहे. मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती होणार आहे. अंगणवाडी सेविकांचा २० टक्के पगार वाढ केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी १५० कोटी खर्च केले जाणार आहेत. मनपा क्षेत्रात २०० कंटेनर अंगणवाड्या सुरू करणार. अंगणवाडी भाड्डेदर वाढवला जाणार आहे. अशी माहितीही लोढा यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने