लाडक्या मित्राला अखेरचा निरोप, सलमानला अश्रु अनावर!

मुंबई: बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांना अखेरचा निरोप देताना अनेक अभिनेत्यांना अश्रु अनावर झाले होते. आपल्या हसऱ्या स्वभावानं सगळ्यांना आपलेसं करणाऱ्या सतीश कौशिक यांचे निधन बॉलीवूडसाठी धक्कादायक घटना आहे. सोशल मीडियावर कौशिक यांच्या शेवटच्या प्रसंगी त्यांना आदरांजली वाहणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रेटींचे व्हिडिओ समोर आले आहेत.कौशिक यांच्या निधनानंतर बॉलीवूडमधील दिग्गज सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर, अमिताभ बच्चन, अभिनेत्री शहनाज गिल, शिल्पा शेट्टी, अनिल कपूर, गोविंदा, अक्षय कुमार, सलमान खान यांनी सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्वासाठी कौशिक प्रसिद्ध होता. त्यांचा स्वभाव हा अनेकांना प्रिय होता.सलमान खान आणि सतीश कौशिक यांचे वेगळे बाँडिंग होते. त्यामुळे कौशिक यांना शेवटचा निरोप देताना सलमान कमालीचा भावूक झाला होता. सलमानला शोक आवरता आला नाही. त्या भावूक प्रसंगाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी सलमानच्या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.सतीश कौशिक यांनी २०२३ मध्ये दिग्दर्शित केलेल्या तेरे नाम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यात बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याची प्रमुख भूमिका होती. तेरे नाम या चित्रपटानं कौशिक यांना मोठं यश मिळवून दिलं होतं. बॉक्स ऑफिसवर देखील त्यानं मोठी कमाई केली होती. त सलमान खान जेव्हा कौशिक यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी हजर होता. तिथून बाहेर पडल्यानंतर त्याला अश्रु अनावर झाले होते.कौशिक यांच्या परिवाराविषयी बोलायचे झाल्यास त्यांच्या पश्चात पत्नी शशि कौशिक आणि अकरा वर्षांची मुलगी वंशिका आहे. वंशिकापूर्वी कौशिक यांना एक मुलगा होता.मात्र वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षीच त्यांच्या मुलाचा मृत्यु झाला होता. कौशिक यांना त्याच्या मृत्युनंतर मोठा धक्का बसला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने