कृषी क्षेत्रासाठी अर्थमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठीच्या मोठ्या योजनांची घोषणा केली आहे.

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित

1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी

2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास

3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास

4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा

5) पर्यावरणपूरक विकासफडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या मोठ्या घोषणा

 • कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणार

 • शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या ६ हजार रूपयांमध्ये आणखी ६ रूपयांची वाढ राज्य सरकारकडून केली जाणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांकडून वर्षाकाठी १२ हजार रूपये मिळतील.

 • शेतकऱ्यांच्या विम्याचा हफ्ता सरकार भरणार असल्याची मोठी घोषणा फडणवीसांनी केली. यासाठी शेतकऱ्यांना फक्त एक रूपया भरावा लागणार असून शासनातर्फे यावर ३३१२ कोटी रूपये खर्च केले जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

 • या योजनेचा १ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार

 • एकात्मिक पीक आधारित आराखडा तयार करणार

 • नमो शेतकरी महासन्मान योजना फडणवीसांकडून जाहीर झाली आहे.

 • येत्या तीन वर्षात सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले जाणार

 • बुलढाण्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र

 • शेतकऱ्यांच्या नुकसानीचे इ-पंचनामे होणार

फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या मोठ्या घोषणा

 • धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार रुपयांची मदत

 • शेततळे योजनेचा विस्तार करणार

 • गोपीनाथ मुंडे अपघात योजना सुरू करणार

 • अपघातग्रस्त शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची मदत

 • सेंद्रीय शेतीसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद

 • बुलढाण्यात संत्रा प्रकल्प प्रक्रियेसाठी ३० कोटींची तरतूद

 • काजू प्रक्रिया उद्योगासाठी १ हजार ३५४ कोटींचं अनुदान

 • धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रतीहेक्टरी १५ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

 • जलयुक्त शिवार भाग २ ची योजना फडणवीसांकडून जाहीर

 • मच्छिमारांसाठी ५ लाखांचा विम्याची घोषणा

 • मागेल त्याला ठिबक सिंचन आणि शेततळे योजना

 • पश्चिम वाहिनी नद्यांना पूर्वेकडे वळवण्यासाठी भरघोस निधीची तरतूद

 • नदीजोड प्रकल्पासाठी शासनाचा निधी देणार

 • कोकणातील सिंचनासाठी विशेष योजना

 • मेंढी पालकांच्या महामंडळासाठी १० हजार कोटींची तरतूद

 • ३० टक्के कृषीवाहिन्यांचे सौर उर्जीकरण करणार

 • मराठवाड्यातील दुष्काळ मुक्तीसाठी मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी पाठपुरावा करणार

 • मराठवाड्यासाठी घर घर जल योजना राबवणार

 • मराठवाड्यातील दुष्काळ मिटवण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद

 • पुढील वर्षात २७ जल प्रकल्प पूर्ण करणार

 • तापी खोऱ्यातील पाणी पातळी महापुनर्भरण प्रकल्पावर लक्ष देणार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने