कोल्हापूरची शिवाली गाजवणार महिला आयपीएलचं मैदान!

कोल्हापूर: महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामासाठी कोल्हापूरची शिवाली शिंदे यूपी वॉरियर्स संघाकडून करारबद्ध  झाली आहे. शिवालीला उर्वरित हंगामासाठी लक्ष्मी यादवच्या बदली संघात सहभागी करण्यात आले आहे. यष्टिरक्षक-फलंदाज लक्ष्मीला प्रशिक्षणादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे हंगामातून  बाहेर पडावे लागले आहे.आंतरराष्ट्रीय महिला दिनीच यूपी वॉरियर्स संघात शिवाली सहभागी झाली असून, ती यापूर्वी महाराष्ट्र वरिष्ठ संघातून  खेळली आहे. वरिष्ठ महिला टी २० चॅलेंजर ट्रॉफीमध्ये भारत-अ संघाकडून खेळली आहे. शिवाली सलामीवीर असून मोक्याच्या क्षणी जलद धावा करण्यासाठी आणि संघाला धावगती वाढवण्यास मदत करणारी खेळी करणारी आहे. यूपी वॉरियर्स संघासाठी महिला प्रीमियर लीगच्या पहिल्याच हंगामामध्ये खेळणे हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण असून ही संधी मिळाल्याने मी व माझे कुटुंबीय आनंदित आहे, अशी भावना शिवालीने व्यक्त केली आहे.यूपी संघाचा पुढील सामना स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध १० मार्चला मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने