ऑलिंपिक पदकविजेत्या सिंधूला सलामीलाच धक्का

लंडन : भारताची अनुभवी खेळाडू पी. व्ही. सिंधूचा सुमार फॉर्म ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतही कायम राहिला. चीनच्या झँग यीमन हिच्याकडून तिला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. तिचे आव्हान संपुष्टात आले. प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकण्याच्या तिच्या आशांवर पाणी फेरले गेले.सिंधू-झँग यांच्यामधील पहिल्या गेममध्ये चुरस पाहायला मिळाली; मात्र सिंधूला दबावाखाली आपला खेळ उंचावता आला नाही. झँग हिने पहिला गेम २१-१७ असा आपल्या नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये झँगने आक्रमक खेळ केला. सिंधूला सूरच गवसला नाही. अखेर या गेममध्ये झँग हिने २१-११ अशी बाजी मारली. सिंधूला सरळ दोन गेममध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. झँग हिने ही लढत ३९ मिनिटांमध्ये जिंकली.ट्रीसा-गायत्रीचा विजय

भारतीय खेळाडूंनी दुहेरीत विजय साकारला. ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद पुलेला या जोडीने महिला दुहेरीत पहिल्या फेरीचा अडथळा ओलांडला. ट्रीसा-गायत्री जोडीने जोंगकोलपान कितीथारकुल-रविंदा प्रजोंगजेई या जोडीवर २१-१८, २१-१४ असा ४६ मिनिटांमध्ये विजय संपादन केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने