"...नोकऱ्या मिळणार नाहीत"; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं अजब विधान

दापोली: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सतत वेगवेगळ्या विधानाने चर्चेत असतात. त्याच प्रमाणे आज देखील एक विधान केलं आहे. दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभामध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी धक्कादायक विधान केलं आहे.कार्यक्रमात बोलताना सत्तार म्हणाले की, अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या घेतल्या आहेत. परंतु भविष्यामध्ये सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत, पण ज्यांना मिळणार, मी सांगितलं तर सगळ्यांना हसू आलं. मात्र आता ज्या ७५ हजार नोकऱ्या मिळणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या पुढील लोकांना ही सुवर्ण संधी आहे. असं म्हणत सत्तारांनी वेळ मारली.तर मागील काही दिवसांपुर्वी ते म्हणाले होते की, शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. या विधानामुळे देखील सत्तार अडचणीत आले होते.या आगोदर अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर सत्तार भडकले आणि त्यांचं आपल्या बोलण्यावरील नियंत्रण सुटलं अन् ते म्हणाले, इतकी भिकार....झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने