मेस्सी तुझी वाट पाहतोय असं म्हणत सुपर मार्केटमध्ये गोळीबार; काय आहे नेमकं प्रकरण?

अर्जेंटिना: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीच्या नावाने एक संदेश लिहीत काही समाजकंटकांनी मेस्सीच्या कुटुंबीयांशी निगडीत एका सुपर मार्केटमध्ये गोळीबार केला. याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांनी गुरूवारी दिली. या गोळीबारात सुदैवाने कोणी जखमी झालेले नाही. हल्लेखोरांनी अर्जेंटिनामधील तिसरे सर्वात मोठे शहर रोसारियोमधील युनिको सुपर मार्केटवर का हल्ला केला हे समजले नाही.युनिको सुपरमार्केट हे मेस्सीची पत्नि अँटोनेला रोकुजोच्या कुटुंबींयाच्या मालिकीचे आहे. शहराचे महापौर पाब्लो जावकिन यांनी रोसारियोमध्ये सुपर मार्केटचा दौरा केला. यानंतर अमली पदार्थाच्या संबंधातील हिंसाचार रोखण्यात अधिकारी विफल ठरत असल्यामुळे त्यांना धारेवर धरले.या गोळीबारानंतर पोलिसांनी सांगितले की, मोटरसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी युनिको सुपर मार्केटमध्ये 12 पेक्षा जास्त गोळ्या झाडल्या. याचबरोबर यासोबत त्यांनी एक संदेश देखील सोडला. 'मेस्सी आम्ही तुझी वाट पाहत आहोत. जावकिन देखील एक ड्रग्ज डिलर आहे त्यामुळे तो तुझी सुरक्षा करू शकणार नाही.' असा संदेश त्यांनी दिला.अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या लिओनेल मेस्सीने या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने 36 वर्षांनी वर्ल्डकपवर नाव कोरले. मेस्सी सध्या पेरिस सेंट जर्मेनकडून खेळ आहेत. तो आपला जास्तीजास्त काळ हा विदेशात घालवतो आहे. तो कायम रिसारियोला जात असतो. येथील फनीस उपनगरीय भागात त्याचे घर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने