गौतम अदानींच्या धाकट्या लेकाचा पार पडला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहेत जीत अदानी?

मुंबई: भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी पुन्हा एकदा लग्न सोहळा रंगणार आहे. त्यांचा धाकटा मुलगा जीत अदानी यांचे लग्न झाले आहे.रिपोर्टनुसार, हिरे व्यापाऱ्याची मुलगी दिवा जैमीन शाह आता अदानी कुटुंबात धाकटी सून म्हणून प्रवेश करणार आहे. मात्र, लग्नाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. रविवारी 12 मार्च 2023 रोजी गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी याने दिवा जमीन शाहसोबत लग्न केले. गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका खाजगी समारंभात हा सोहळा पार पडला. यामध्ये दोन्ही कुटुंबातील जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.अदानी यांची भावी सून दिवा जमीन शाह  C.Dinesh & Co. Pvt. Ltd चे मालक जमिन शाह यांची मुलगी आहे.

कोण आहेत जीत अदानी?

गौतम अदानी यांना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचे नाव करण अदानी आणि धाकट्याचे नाव जीत अदानी आहे. धाकटा मुलगा जीत अदानी याचा जन्म 7 नोव्हेंबर 1997 रोजी झाला. जीत अदानी यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.2019 मध्ये जीत भारतात परतला. जीत अदानी आणि त्याचा मोठा भाऊ करण या दोघांनीही परदेशातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. जीतनेही वडील आणि भावाप्रमाणे व्यवसाय हाताळण्यास सुरुवात केली आहे.जीत अदानी 'अदानी समूहा'चा व्यवसाय सांभाळत आहेत :

जीत अदानी हे 2019 पासून अदानी समूहाशी संबंधित आहेत आणि त्यांचा व्यवसाय त्यांच्या वडिलांसोबत शेअर करत आहेत. जीत अदानी यांची 2022 मध्ये अदानी समूहामध्ये उपाध्यक्ष (वित्त) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.अदानी समूहाचा देशात आणि जगात मोठा व्यवसाय आहे. या समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी आहेत. अदानी समूह मुख्यत्वे बंदरे, तेल आणि वायू उत्खनन, वीज निर्मिती, कोळसा व्यापार, गॅस वितरण आणि कोळसा खाण या व्यवसायात गुंतलेला आहे.

मोठा मुलगा करणचे 2013 मध्ये लग्न झाले :

यापूर्वी, गौतम अदानी यांचा मोठा मुलगा करणचा विवाह सुप्रसिद्ध कॉर्पोरेट वकील सिरिल श्रॉफ यांची मुलगी परिधी अदानीशी झाला होता. दोघांच्या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही पोहोचले होते. करण अदानी सध्या अदानी पोर्ट अँड SEZ लिमिटेड (APSEZ) चे सीईओ आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने