Oscars 2023मध्ये फक्त RRRचीच हवा! आलिया भट्ट आणि 'या' सुपरस्टारला मिळाला हॉलीवुड 'स्पॉटलाइट अवॉर्ड'

मुंबई: ऑस्कर 2023 ची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. यंदाच्या ऑस्करमध्ये भारताच्या वतीने RRR हा चित्रपट एकामागून एक कामगिरी करत आहे. SS राजामौली यांच्या RRR चित्रपटाला बॅक टू बॅक मोठे पुरस्कार मिळत आहेत.सर्वात प्रथम गोल्डन ग्लोब पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. आता ऑस्करच्या निकालाचीच प्रतिक्षा लागलेली असतांनाच आता हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनने 2023 च्या कार्यक्रमात RRR ला एकाच वेळी पाच पुरस्कार दिले आहेत.ज्यामध्ये आलिया भट्टला 'सीता' आणि ज्युनियर एनटीआरला भीमाच्या भूमिकेसाठी स्पॉटलाइट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनने अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर यावर्षीच्या पुरस्कारांची माहिती शेअर केली आहे.एसएस राजामौलीच्या चित्रपटाची जादु आपण सर्वांनीच पाहिली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळचं घातला. आता त्यातच आता हा चित्रपट अनेक पुरस्कार आपल्या नावे करत आहे.SS राजामौली यांच्या RRR चित्रपटाला गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023 मध्ये 'नाटू-नाटू'साठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या मोशन पिक्चर श्रेणीमध्ये प्रथमच पुरस्कारही मिळाला. तेलुगू गाणे 'नाटू-नाटू' संगीतकार एम.एम. कीरावणी यांनी संगीतबद्ध केलेले आणि काल भैरव आणि राहुल सिपलिंगगुंज यांनी गायले आहे.तसचं ज्युनियर NTR आणि राम चरण स्टारर चित्रपट ऑस्कर प्रमोशनसाठी 1 मार्च रोजी यूएस मध्ये जगातील सर्वात मोठा स्क्रीनिंग म्हणून पुन्हा रिलीज आला होता त्यावेळी हा स्क्रिनिंग बंपर हाउसफुलसह पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.निर्माते, अभिनेते आणि RRR चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह, भारतीय चित्रपट चाहत्यांना आता आरआरआर हा ऑस्कर 2023ची ट्रॉफी भारतातच आणणार अशी पुर्ण आशा आहे आणि त्यासाठी ते प्रार्थनाही करीत आहेत.RRR चित्रपटातील गाण्यांच्या 'नाटू-नाटू' ला ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. ऑस्करचा निकाल १२ मार्चला जाहीर होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने