'शाहरुखचा नाद करुन चालत असतंय का?' विराट अन् अक्षय पडले तोंडावर!

मुंबई: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याची गोष्टच वेगळी आहे. त्याच्या पठाण चित्रपटावरुन जो वाद झाला होता त्यामुळे तो भलताच ट्रोल झाल्याचे दिसून आले. पण किंग खाननं आपल्या चित्रपटानं टीकाकारांना उत्तरं दिली. तो काय चीज आहे हे त्यानं दाखवून दिलं. पठाण प्रदर्शित झाला आणि त्यानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.सध्या किंग खान हा वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. बाकी कुणी काही का म्हणेना जेव्हा शाहरुखचं एखादं ट्विट किंवा त्याची एखादी पोस्ट रिलिज होते तेव्हा मात्र त्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण येते. आता सोशल मीडियावर #DinnerWithSRK असा ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे बादशहा शाहरुख चर्चेत आला आहे. त्याच्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारही चर्चेत आहेत.चाहत्यांच्या प्रतिक्रिया, लाईक्स यामुळे #DinnerWithSRK सोशल मीडियावर जोरदारपणे ट्रेंड होताना दिसतो आहे. त्या ट्रेंडनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळेच की काय विराट कोहली आणि अक्षय कुमारला देखील त्या ट्रेंडनं मागे टाकले आहे. आरवीसीजे मीडियाच्या एका पोस्टनं वेगळ्याच चर्चेला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये त्यांनी विराट कोहली, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि लियोनल मेस्सी यांच्या चाहत्यांना एक आवाहन केले होते. ज्यामध्ये त्यांना आपल्या सेलिब्रेटीसोबत काय करायला आवडेल असे विचारले होते.बऱ्याचशा चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी विराटसोबत बॅटिंग, अक्षय कुमारसोबत सेल्फी आणि मेसीसोबत फुटबॉल खेळायला आवडेल असे उत्तर दिले. 

पण लाखो चाहत्यांनी आम्हाला शाहरुख सोबत डिनरला जायला आवडले असे लिहिताच सोशल मीडियावर ट्रेंड वेगानं व्हायरल होताना दिसतो आहे. त्या वेगात विराट, मेस्सी आणि अक्षय कुमार खूपच मागे पडले आहेत. यावर नेटकऱ्यांनी काही गंमतीशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.आरवीसीजेच्या त्या चँलेंजमध्ये अनेक चाहते आणि नेटकऱ्यांनी डिनर विथ एसआऱकेची निवड केली. त्यानंतर तो टॅग ट्विटरवर ट्रेंड होताना दिसतो आहे. एका नेटकऱ्यानं तर शाहरुखचा नाद नकोच, त्याच्यापुढे सगळे फिके आहेत असे म्हटले आहे. आतापर्यत चार हजारांपेक्षा जास्त ट्विट्सनं त्या हॅशटॅगचा वापर केल्याचे दिसून आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने