शिंदे-फडणवीसांना शह देण्यासाठी अजितदादांनी स्पष्ट केली रणनिती; 'मविआ' आता...

मुंबई: राज्यातील विधानसबा निवडणुकीला जेमतेम एक वर्ष शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेतून अनपेक्षितपणे बाहेर पडलेल्या महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सध्या शिवसेनेची वाताहत झाली असून पक्षचिन्हासह अख्खा पक्ष भाजपसोबत असताना उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे आज अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत पुढील रणनिती स्पष्ट केली.अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड मध्ये झालेल्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. तशीच गर्दी आता प्रत्येक सभेला व्हायला हवी. सभेला महत्त्वाच्या पक्षाचे केवळ दोन प्रतिनिधी भाषणं करतील. सभेची सुरुवात मराठवाड्याच्या प्रवेशद्वारात छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. त्यासाठी अंबादास दानवे पुढाकार घेतली. त्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र यायचं. ही सभा २ एप्रिल रोजी होणार छत्रपती संभाजीनगरमध्ये होईल, असंही त्यांनी सांगितलं.१६ एप्रिल रोजी नागपूर येथे सुनील केदार यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं आहे. 1 मे रोजी मुंबईत सभा होणार आहे. यासाठी आदित्य ठाकरे पुढाकार घेतील. त्यांना सर्व पक्षांनी सहकार्य करायचं आहे. या सभा विभागवार आहे. त्यामुळे इतर जिल्हे कव्हर झाले पाहिजे. तर पुण्यात १६ मे रोजी होणार आहे. पुण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.

 सर्व पक्षांसोबत चर्चा करून त्याचं नियोजन केलं जाईल, असंही अजित पवार यांनी सांगितलं. २८ मे रोजी कोल्हापुरात सभा होईल. तिथे सतेज पाटील पुढाकार घेईल.सभाचं आयोजन सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. ३ जून रोजी नाशिकमध्ये सभा होईल. येथील जबाबदारी छगन भुजबळ घेणार आहेत. ११ जून रोजी अमरावतीत सभा होईल. याची जबाबदारी यशोमती ठाकूर यांची राहणार आहे. जो सभा मोठी घेईल, त्याला निश्चित बक्षीस मिळणार असंही अजितदादा म्हणाले. तसेच पाऊस असो किंवा नसो, सभा होणार. पावसात सभा झाली की आपल्याला फायदा होता, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने