आधी बाप पळवत होते, आता मुलं पळवतायत - संजय राऊत

मुंबई:  ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरुन सुभाष देसाई यांनी निवेदनही जाहीर केलं. यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सुभाष देसाई हे पक्षाचे नेते आहेत, त्यांचा मुलगा नाही. त्याचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, असंही राऊत म्हणाले आहेत. तसंच शिंदे गट कुचकामी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. राऊत म्हणाले, "सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे चिरंजीव नाहीत. त्या मुलाचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही."शिंदे गटाची भरती कुचकामी आहे, असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. राऊत म्हणाले,"शिंदे गट आधी बाप पळवत होते, आता मुलं पळवत आहेत. त्यांची भरती कुचकामी आहे. सामंत लोणीवाले हे मिंधे गटात आहेत. त्यांनी देसाईंच्या चिरंजीवावर आरोप केले होते. त्यांच्या चौकशीचेही आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी वॉशिंग मशीनमधून त्यांना स्वच्छ केलं.""ही भाजपाची वॉशिंग मशीन आहे. याचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. मिंधे गटासमोर हा कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न आहे", असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने