'ज्यांनी नवाब मलिकांना तुरुंगात टाकलं त्यांनाच..'; भाजपला पाठिंबा दिल्यामुळं ओवैसींचा पवारांवर निशाणा

मुंबई:  नागालँडमधील  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भाजप आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनीच या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला.राष्ट्रवादीच्या या निर्णयानंतर आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी  यांनी पवारांवर निशाणा साधलाय.ओवैसी म्हणाले, 'राष्ट्रवादी भाजपच्या  B टीमप्रमाणं काम करत आहे. हे कोणीही म्हणणार नाही. शरद पवार जर 'शादाब' असते तर सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी त्यांच्या पक्षाला भाजपची बी टीएम म्हटलं असतं. एवढंच नाही, तर पवारांना धर्मनिरपेक्षांनी अस्पृश्यही म्हटलं असतं. मी कधीही भाजप सरकारला पाठिंबा दिला नाही आणि कधीच देणार नाही, पण राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा देण्याची ही दुसरी वेळ आहे.'ज्या भाजपनं राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकलं, त्याच भाजपला राष्ट्रवादी पाठिंबा देत असल्याचं ओवैसी म्हणाले. मंत्री नवाब मलिक  यांना तुरुंगात टाकणाऱ्यांना राष्ट्रवादी पाठीशी घालत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नागालँडमध्ये भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा

नागालँडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील रिओ सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नागालँडच्या जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेत असल्याचं सांगत या निर्णयाला पाठिंबा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने