भाजपला धक्का बसणार? अनेक आमदार काँग्रेसच्या वाटेवर, प्रदेशाध्यक्षांचा मोठा गौप्यस्फोट

म्हैसूर: आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकूण 224 जागांपैकी 140 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी केला आहे.सत्ताधारी भाजपचे अनेक विद्यमान आमदार येत्या काही दिवसांत पक्षात प्रवेश करणार असल्याचंही ते म्हणाले. भाजपचे दोन माजी आमदार आणि म्हैसूरचे माजी महापौर यांना पक्षात सामील केल्यानंतर डीके शिवकुमार पत्रकारांशी बोलत होते. म्हैसूरचे माजी महापौर पुरुषोत्तम यांच्यासह माजी आमदार जीएन नंजुनदास्वामी आणि विजापूरचे आमदार मनोहर ऐनापूर यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2022 च्या गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला कर्नाटकमध्ये लवकर निवडणुका घ्यायच्या होत्या, परंतु या निर्णयापासून ते मागं हटले, असा दावाही शिवकुमार यांनी केलाय.भाजपला वाटतं की जेवढे दिवस त्यांना मिळतील तेवढे ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतील. लगेच निवडणुका झाल्या तरी काँग्रेसची तयारी आहे. निवडणूक आयोगानं तातडीनं निवडणुकांच्या तारखा जाहीर कराव्यात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.'अनेक भाजप नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार'शिवकुमार पुढं म्हणाले, "माजी आमदार भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. येत्या काही दिवसांत आम्ही विद्यमान आमदारांची यादीही जाहीर करू. यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मी आता कोणाचंही नाव सांगणार नाही. नेते बिनशर्त काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आणि पक्षाची विचारधारा आणि नेतृत्व स्वीकारत आहेत. जनमत काँग्रेसच्या बाजूनं असल्याचं स्पष्ट झालं आहे."

'काँग्रेस 140 पेक्षा जास्त जागा जिंकेल'

शिवकुमार म्हणाले, "आमच्या आधीच्या सर्वेक्षणात आमच्या जागेचा अंदाज 136 जागांवर होता. मात्र, आता आमचा सर्व्हे 140 जागांचा अंदाज घेत आहे. बदल सुरू झाला आहे. आम्ही तो राज्यभर फिरताना पाहत आहोत."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने