पुन्हा भेटू लवकर.. असंं म्हणत Amruta Khanvilkar ने जाहीर केला 'हा' धक्कादायक निर्णय

मुंबई:  अभिनेत्री अमृता खानविलकर फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. अमृताच्या फोटो आणि व्हिडिओवर फॅन्स नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात.आता मात्र अमृताच्या फॅन्सना काळजी लागून राहिली आहे. कारण गोष्ट सुद्धा तशीच घडली आहे. अमृताची हि लेटेस्ट पोस्ट पाहून फॅन्सना काळजी वाटत आहे.अमृताने सोशल मीडियाला रामराम का ठोकला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु अमृताच्या फॅन्सना मात्र तिची काळजी लागून राहिली असून त्यांनी अमृताला काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.याशिवाय अनेकांना अमृताची हि आगामी सिनेमासाठी असलेली प्रमोशनल ऍक्टिव्हिटी वाटत आहेअमृताने सोशल मीडियावर एक Quote चा फोटो पोस्ट केलाय. या Quote चा अर्थ असा आहे कि.. "मी तुला पुन्हा भेटेन.. जेव्हा योग्य वेळी आपले मार्ग कधीतरी पुन्हा एकमेकांसमोर कधीतरी येतील",अशी पोस्ट अमृताने लिहिली आहे. याशिवाय "Taking Break", "पुन्हा भेटू" असं जाहीर करत अमृताने सोशल मीडियाला रामराम ठोकल्याचा धक्कादायक निर्णय घेतलाय.अमृता २०२२ ला चंद्रमुखी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. चंद्रमुखी सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. तर दुसरीकडे अमृताच्या आगामी कलावती सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. कलावती सिनेमाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.

यात पडद्याआड अमृता खानविलकरची रहस्यमय नजर दिसतेय. कलावती मध्ये दिग्गज कलाकारांची फौज असून अमृताची जोडी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने सोबत जमणार आहे.कलावतीचं पोस्टर पाहून अमृता खानविलकर पुन्हा एकदा लावणीसम्राज्ञीच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा आहे. पण लावणी आणि कलावतीचा काहीही संबंध नाही. कलावती निमित्ताने पहिल्यांदाच संजय जाधव हॉरर कॉमेडी प्रकाराचं दिग्दर्शन करणार आहेत.अमृता खानविलकर सुद्धा प्रथमच मराठी सिनेमात अशी आगळीवेगळी भूमिका साकारणार आहे. याशिवाय अमृता लवकरच धावपटू ललित बाबर यांच्या आयुष्यावर आधारीत मी ललित बाबर सिनेमात झळकणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने