चाहत्यांसाठी वाईट बातमी! मोदींच्या आगमनामुळे अहमदाबाद कसोटीची तिकीटे लॉक

अहमदाबाद: ऑस्ट्रेलियाने तिसरा कसोटी सामना 9 विकेट्सनी जिंकून मालिकेत जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे आता चौथ्या अहदमाबाद कसोटीत काय होणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. मालिकेचा विजेता आणि भारताचे WTC फायनलचे तिकीट बूक करणे याच सामन्यावर अवलंबून आहे.मालिकेतील निर्णाय कसोटी ठरलेल्या अहमदाबाद कसोटी पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची झुंबड उडेल असे वाटत होते. मात्र आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नरेंद्र मोदी स्टेडियमवरील भारत ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना पाहण्यासाठी येणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवसाची तिकीटे लॉक करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज देखील उपस्थित राहणार आहेत.गुजरात क्रिकेट असोसिएशनने चौथ्या कसोटीसाठी सामन्य नागरिकांसाठी तिकीट विक्री सुरू केली होती. अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस सोडून क्रिकेट चाहते या कसोटीच्या उर्वरित चार दिवसांसाठी बूक माय शो अॅपवरून तिकीट बूक करू शतकात. गुजरात क्रिकेट असोसिएशनने चौथ्या कसोटीसाठी 200, 300, 350, 1000 आणि 2000 रूपयांची तिकीटे उपलब्ध केली आहेत.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव, जयदेव उनाडकट

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने