कोणीतरी येणार ग...? मग आधी हा लसींचा तक्ता जाणून घ्या

मुंबई: घरात बाळाचं आगमन होणार याची बातमी करताच घरातलं सगळं वातावरणच बदलतं. एक वेगळंच प्रफुल्लीत वातावरण होतं. मग बाळाला कोणती खेळणी आणायची, कोणते कपडे घ्यायचे, नाव काय ठेवायचं, आईने काय काय खायला हवं, बाळाला काय खाऊ द्यायचा, बाळासाठी चांदीचा वाटीचमचा आणायचा... असे एक ना अनेक गोष्टींचे नियोजन सुरू होते.पण आपण याचा विचार करतो का की, बाळ सुदृढ राहण्यासाठी त्याला वेळच्या वेळी आवश्यक त्या लसीही दिल्या जाणे तेवढ्याच आवश्यक आहेत. त्यासाठी आधीच त्याची माहिती करून घेणं गरजेचं असतं. जाणून घेऊया सविस्तर.मुल जन्माला आल्यापासून ते त्याच्या वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत वेळच्या वेळी काही आजारांवर लसीकरण करून घेणं गरजेचं असतं. त्यापैकी महत्वाच्या ५ लसींविषयी सविस्तर माहिती आणि एकूण कोणत्या वयात कोणती लस घ्यावी याविषयीचे महापालिकेचे वेळापत्रक या

बीसीजी लस

बाळाच्या जन्मानंतर लगेच त्याला लगेच बीसीजी लस दिली जाते. ही लस क्षय रोगाच्या जीवाणूंपासून बाळाचा बचाव करते. क्षयरोगातील मेंदू ज्वरासारखे (टीबी मेनिंजायटिस)  काही आजार बाळासाठी घातक ठरू शकतात. विविध प्रकारच्या क्षय रोगापासून बचावासाठी प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून ही लस दिली जाते.



ट्रिपल (त्रिगुणी) / पेंटाव्हॅलंट लस

बाळ दीड महिन्यांच झाल्यावर त्याला ट्रिपलची लस दिली जाते. याच लशीला डीपीटी असंहा म्हणतात. डीपीटी म्हणजे घटसर्प (डिप्थेरिया), डांग्या खोकला (परट्युसिस) आणि धनुर्वात (टिटॅनस). बाळ दीड महिन्यांच झाल्यावर या लशीचा पहिला डोस, अडीच महिन्यांचं झाल्यावर दुसरा तर साडेतीन महिन्याचं झाल्यावर तिसरा डोस दिला जातो.बाळ दीड वर्षांचं झाल्यावर आणि बाळाच्या ४-५ वर्ष वयाच्या दरम्यान एकदा डीपीटी लशीचे बूस्टर डोस दिले जातात यामुळे आजारांपासून अधिक संरक्षण मिळू शकते.याच लशीत आता पेंटाव्हॅलंट (पंचगुणी) लशीचा पर्याय आला आहे. यात डीपीटी लशीचे सर्व गुण अधिक कावीळ (हिपॅटायटीस बी) आणि एन्फ्लूएन्झा ताप याविषयीची रोगप्रतिकार शक्ती तयार केली जाते.

हिपॅटायटिस ए साठी लस

हिपेटायटिस 'ए' ही विषाणूजन्य कावीळ आहे. यापासून बचावासाठी मुल १ वर्षाचं झाल्यावर दिली जाते आणि ६ महिन्यांची झाल्यावर दुसरा डोस दिला जातो.

पोलिओ डोस

भारतातून पोलिओ हद्दपास झाल्याचं 'जागतिक आरोग्य संघटने'नं (डब्ल्यूएचओ) २०१४ मध्ये जाहिर केलेलं असलं तरी मुल ५ वर्षांचं होईपर्यंत त्याला पोलिओ डोस देणं आवश्यक आहे. पोलिओची लस जशी तोंडावाटे दिली जाते तशीच इंजेक्टही करण्याची निघाली आहे. दोन्हीही प्रभावी आहेत.

एमएमआर लस

एमएमआर लस म्हणजे गोवर (मीझल्स), गालगुंड (मम्प्स) आणि रुबेला या तीन आजारांवर प्रतिबंध करते. बाळ नऊ महिन्याचं झाल्यावर या लशीचा पहिला डोस देतात. १५ महिन्यांच झाल्यावर दुसरा व ४-५ वर्षं वयाच्या दरम्यान तिसरा डेस दिला जातो. गोवर लहानमुलांमध्ये गंभीर आजार ठरू शकतो म्हणून ही लस महत्वाची आहे.

कांजण्यांवरील लस

कांजण्या (चिकनपॉक्स) हा जवळपास सर्वच लहान मुलांमध्ये एकदा तरी होणारा संसर्गजन्य आजार आहे. प्रामुख्याने उन्हाळ्यात होतो. कांजण्यांच्या प्रतिबंधासाठी लशीचा पहिला डोस मुलांना पंधराव्या महिन्यात दिला जातो. त्यानंतर तीन महिन्यांनी दुसरा डोस दिला जातो.

टायफॉईड लस

टायफॉईड तापाच्या प्रतिबंधासाठी या लशीचा पहिला डोस बाळाला ९ ते १२ महिन्यांच्या दरम्यान दिला जातो. तर दुसरा बाळ दोन वर्षाचं झाल्यावर देतात. ठराविक वयात लहान मुलांना 'रोटाव्हायरस डायरिया'ची लसही देणं आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने