विरोधकांच्या ऐक्याला धक्का! 2024 लोकसभा निवडणुकीबाबत ममतांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील सागरदिघी विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने टीएमसीचा पराभव करून नवा इतिहास रचला आहे. तब्बल दहा वर्षांनंतर सागरदिघी मतदारसंघातून टीएमसी बाहेर पडली आहे. काँग्रेसचे उमेदवार बायरन बिस्वास यांनी टीएमसीचे देबाशीष बॅनर्जी यांचा २२ हजार मतांनी पराभव केला.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या विजयामुळे नाराज आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तृणमूल काँग्रेस 2024ची निवडणूक एकट्याने लढणार आहे.सागरदिघी पोटनिवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांचे मोठे विधान गुरुवारी समोर आले. काँग्रेसचा विजय अनैतिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तृणमूलला पराभूत करण्यासाठी माकपसह काँग्रेस पक्षाने भाजपशी करार केला, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.दरम्यान पोटनिवडणुकीतील पराभवासाठी आपण कोणालाही जबाबदार धरत नाहीत. मात्र आम्हाला पराभूत करण्यासाठी एक अनैतिक युती झाली होती, असंही ममता यांनी म्हटलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने