मुह से सुपारी निकालकर बात कर बाबा... Hera Pheri 3 मध्ये Sanjay Dutt साकारणार हि धम्माल भूमिका

मुंबई:  अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा हेरा फेरी ३ सिनेमाचं शूटिंग सुरु झालंय. सध्या मुंबईतील अंधेरीत एम्पायर स्टुडिओमध्ये हेरा फेरी ३च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.हेरा फेरी ३ बद्दल मोठी अपडेट काही दिवसांपूर्वी समोर आली ती म्हणजे यंदाच्या भागात संजय दत्त आणि अर्शद वारसीसहभागी असणार आहेत.आता संजय दत्त यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे संजय दत्त हेरा फेरी ३ मध्ये एक धम्माल भूमिका साकारणार आहेत. हि भूमिका कोणती हे जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. हि भूमिका म्हणजे तोतला गॅंग.तोतला गॅंग तुम्हाला आठवत असेल. हेरा फेरी २ मध्ये असलेल्या या गॅंगने बोबडं बोलल्यामुळे सर्वांची हसून हसून पुरेवाट लावली.आता याच तोतला गॅंगमध्ये संजय दत्त सहभागी होणार आहे. तोतला गॅंग मध्ये जो रवी किशन असतो त्याच्या मोठया भावाच्या भूमिकेत संजय दत्त दिसणार आहे.त्यामुळे संजय दत्त तोतला गॅंगमध्ये सहभागी होऊन बाबूभैय्या, राजू आणि श्यामला जेरीस आणणार यात शंका नाही. संजय दत्त यांनी स्वतः एक व्हिडिओ शेयर करून ते हेरा फेरी ३ मध्ये आहेत यावर शिक्कामोर्तब केलाय.संजय दत्त हेरा फेरी ३ मध्ये सहभागी होऊन खूप आनंदी आहेत. संजूबाबाने नुकतंच त्याच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या.

संजय दत्त म्हणाला, “हेरा फेरी ही एक अप्रतिम फ्रँचायझी आहे आणि त्याचा एक भाग बनून मला खूप आनंद होत आहे. फिरोज आणि माझे नातेही खूप जुने आहे. अक्षय कुमार, संजय दत्त आणि परेश रावल यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप भन्नाट आहे.काहीच दिवसांपूर्वी अक्षय कुमारने मुंबईत सुनील शेट्टी, परेश रावल आणि निर्माते फिरोज नाडियादवाला यांची भेट घेऊन हेरा फेरी ३ विषयी चर्चा केली.अखेर आज हेरा फेरी ३ सिनेमाला शूटिंग झाली असून पुढच्या वर्षी २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने