अखेर आईनं दीपाला धक्का दिलाच..'रंग माझा वेगळा'ला मागे सारत अरुंधतीची TRP वर बाजी..

मुंबई: ओटीटीचे प्रस्थ कितीही वाढले तरी मालिकांची जादू काही कमी झालेली नाही. आजही चांदया पासून बांदयापर्यंत घराघरात मालिका पाहत जातात. सध्या मराठीमध्ये पाच वाहिन्या आणि पंचवीस हून अधिक मालिका असल्याने कोणती मालिका 'टीआरपी'च्या रेस मध्ये सर्वात वर आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.गेली काही महीने 'स्टार प्रवाह' वाहिनी यामध्ये सर्वात पुढे आहे तर गेली काही दिवस याच वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' ही मालिका सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका ठरत होती. पण यंदा टीआरपीचं चित्र काहीसं बदललं आहे..यंदाही टीआरपीच्या स्पर्धेत 'स्टार प्रवाह' वाहिनी सर्वात पुढे आहे. पण गेले काही दिवस सर्वांची आवडती 'आई कुठे काय करते' ही मालिका कधी तिसऱ्या तर कधी चौथ्या क्रमांकावर असायची. पण यंदा ही मालिका सर्वाधिक पुढे असणाऱ्या 'रंग माझा वेगळा' मालिकेला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.'आई कुठे काय करते' मालिकेत दाखवण्यात येत असलेल्या अरुंधतीच्या लग्नाच्या ट्रॅकचा मालिकेच्या टीआरपीला फायदा होत आहे. तर 'रंग माझा वेगळा' ही मालिका दीपा आणि कार्तिक यांच्यातली बदललेली समीकरणं प्रेक्षकांना फारशी पसंत पडत नसल्याने खाली आल्याचे दिसते.

विशेष म्हणजे 'ठरलं तर मग' या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकत आपला पहिला क्रमांक टिकवून ठेवलेला आहे. गेले काही दिवस ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर चौथ्या स्थानावर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका आहे. आणि 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेने टीआरपीमध्ये पाचवं स्थान मिळवलं आहे.पहिल्या चौदा क्रमांकावर स्टार प्रवाहाच्याच मालिका असून ही वाहिनी गेली कित्येक महीने टीआरपीच्या रेस मध्ये सर्वात पुढे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने