रामदास आठवलेंचा नागालँडमध्ये डंका! आरपीआय दोन जागांवर विजयी

नागालँड: महाराष्ट्रात कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणूकांची चर्चा सुरू असताना इशान्येकडील राज्यामधील निवडणूकांचा निकाल हाती येणे सुरू झाले आहे. या निवडणूकीत पहिल्यांदाच रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) ने बाजी मारली आहे.आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार नागालँडमध्ये विजयी झाले आहे. विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच पक्षाच्या दोन महिला उमेदवारांनी महाराष्ट्राच्या बाहेर विजयाचा गुलाल उधळला आहे.सुरु असलेल्या मतमोजणीत नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी सध्या आघाडीवर असून यादरम्यान महाराष्ट्राच्या बाहेर देखील रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. ही आठवले यांच्यासाठी ही मोठी गोष्ट असल्याचे बोलले जात आहे. या निकालांमुळे इतर राज्यातील निवडणूक निकालांवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता बोलली दात आहे.कोण आघाडीवर?

नागालँडलमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षचे उमेदवार २ जागांवर निवडून आले आहेत. तर, एनडीपीपीचा उमेदवार १ जागेवर निवडून आला आहे. भाजपाचे उमेदवार २ जागेवर निवडून आले असून, १२ जागांवर आघाडीवर आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने