मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला असतांना शिंदेंचा पुन्हा दौरा; यावेळी अयोध्येला जाणार

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथं ते शरयू नदीकाठी आरतीदेखील करतील. राज्यात एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला असतांना एकनाथ शिंदे मात्र आमदारांचे दौऱ्यावर दौरे काढत आहेत.मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे शिंदे गटातील अनेकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. तरीही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नाहीये. मागे अशीच नाराजी पुढे आल्याने शिंदेंचा गुवाहटी दौरा झाला. आता पुन्हा ते अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेचे ४० आमदार, इतर आमदार, १३ खासदार अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी अयोध्येतील शशिकांत महाराज दास, शत्रुघ्न दास महारज आणि छबीराम दास यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांना अयोध्या दौऱ्याचं निमंत्रण दिलं होतं.सध्या राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन आटोपल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एकनाथ शिंदेंचा लवाजम्यासह दौरा होईल, अशी सूत्रांची माहिती आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

गुवाहाट दौऱ्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह मिळालं. सध्या अधिकृतरित्या शिंदेकडे खरी शिवसेना आहे. मात्र ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलंय. त्यासंदर्भातील सुनावण्या सुरु आहेत. आज सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी झाली. उद्या सुनावणीचा शेवटचा दिवस असून न्यायालयाचा निर्णय येऊ शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने