"त्याने मला पाहिलं आणि मी त्याला..."; राहुल गांधींनी सांगितला काश्मीरमधला किस्सा

दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठात बोलत असताना राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यानचा किस्साही सांगितला आहे. यामध्ये त्यांनी काश्मीरमध्ये आपल्याला एक दहशतवादी सामोरा आल्याचंही सांगितलं आहे.राहुल गांधी म्हणाले,"जेव्हा मी यात्रा करत होतो. तेव्हा मला सांगितलं गेलं होतं की तुम्हाला मारलं जाऊ शकतं. पण तरीही आम्ही यात्रा करत आहोत. तेवढ्यात एक व्यक्ती मला म्हणाला की मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा मला सुरक्षारक्षकांनी सांगितलं होतं की तुम्ही असं करू नका, लोकांना जवळ बोलवू नका. पण मी तरीही त्याला बोलावलं, ती व्यक्ती माझ्या जवळ आली."राहुल गांधी पुढे म्हणाले, "त्या व्यक्तीने मला विचारलं की तुम्ही खरंच आमच्या समस्या ऐकायला आला आहात का? मी म्हणालो, हो. त्यानंतर आम्ही एकत्र पुढे चालू लागलो. त्या व्यक्तीने मला एका दिशेला पाहायला सांगितलं. मी तिकडे पाहिलं. त्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की ते दहशतवादी आहेत. खरंतर मी अशा वातावरणात होतो की जिथं दहशतवाद्यांनी मला मारून टाकायला हवं होतं. मी त्याला बघत होतो, तो मला बघत होता. मला वाटत होतं की तो मला मारून टाकेल. पण काहीच झालं नाही. मी त्याला बघत राहतो, तोही मला बघत राहतो आणि आम्ही पुढे निघून जातो.""असं का झालं? असं नाही की त्यांच्याकडे ताकद नाहीये. असं यासाठी झालं की मी त्यांचं म्हणणं ऐकायला आलो होतो. मी कोणत्याही हिंसेसोबत आलो नव्हतो आणि खूप सारे लोक हे पाहत देखील होते", असंही राहुल गांधी पुढे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने