काय होणार जर सर्व महिला एका दिवसासाठी सुट्टीवर गेल्या तर...?

मुंबई: विचार करा जर तुम्ही सकाळी उठला आणि तुमच्या आजुबाजूला तुमची आई, बहिण, मुलगी किंवा पत्नी कोणीच नाही. नंतर तुम्ही ऑफीसला जाता तिथे सुद्धा तुम्हाला कोणतील महिला दिसत नाही. मग कँटीन, दुकान, टिव्हीवर तुम्हाला फक्त पुरुषच दिसतात आणि मग तुम्हाला समजते की आज सर्व महिला सुट्टीवर आहे.ही फक्त एक कल्पना आहे पण खरंच असं झालं आणि सर्व महिला एका दिवसासाठी सुट्टीवर गेल्या तर ... या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कल्पनाही करू शकत नाही पण असं झालं असं कल्पना करुया आणि काय होणार हे आपण सहज जाणून घेऊया. मुलांना कोण शिकवणार

देशात सरकारी आणि प्रायवेट स्कूलमध्ये ५१ टक्के आणि कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये ४३ टक्के महिला टिचर आहे.

उपचारासाठी वाट पाहावी लागेल

देशात ३० टक्के महिला डॉक्टर आहे आणि जवळपास ८० टक्के महिला नर्स आहे.

बँकेत रांगेत उभं राहावं लागणार

SBI - 26%, PNB - 23%, ICICI - 32%, HDFC - 21% महिला कर्मचारी आहे.

कंपनी कोणताच निर्णय घेऊ शकणार नाही

EY रिपोर्टनुसार निफ्टी 500 च्या 95% कंपन्याचे बोर्ड मेंबर या महिला आहेत.

न्युज येणार नाही

प्रिंटमध्ये 13%, रेडीओमध्ये 21% आणि टिव्हीमध्ये 57% महिला आहेत.

घरी जेवण आणि साफसफाई होणार नाही

जर महिला एका दिवसासाठी सुट्टीवर गेल्या तर घरी साफ सफाई होणार नाही. एवढंच काय तर जेवण सुद्धा बनणार नाही. कारण आपल्या देशात केवळ ६ टक्केच पुरुष घरंच जेवण आणि साफसफाई करतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने