'पोटासाठी काय काय करतो बिचारा..',घागरा घालून अक्षयला नाचताना पाहून ट्रोलर्सनी साधला निशाणा

मुंबई: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या सिनेमांमुळे नेहमीच चर्चेत असलेला पहायला मिळतो. अभिनेत्यानं तब्बल ५ सिनेमे रांगेनं फ्लॉप दिले आहेत. त्यामुळे सध्या त्याचे चाहतेच त्याच्यावर रागात आहेत.काही दिवसांपूर्वीच त्याचा 'सेल्फी' सिनेमा रिलीज झाला. 'सेल्फी' सिनेमाची तर बॉक्स ऑफिसवर खूपच दयनीय अवस्था झालेली पहायला मिळाली. हा सिनेमा अक्षय कुमारच्या सबंध करिअर मधला सगळ्यात मोठा फ्लॉप सिनेमा म्हणून जाहीर करण्यात आला.यादरम्यान अक्षय कुमार सिनेमापासून दूर आपल्या एंटरटेन्मेंट टूरवर परदेशात स्टेजवर धडाकेबाज डान्स करताना दिसला..अन् ट्रोलही झालेला पहायला मिळत आहे. 

अक्षय कुमार आपल्या त्या एंटरटेन्मेंट टूरसाठी सध्या अमेरिकेत आहे. अक्षयबरोबर त्या टूरवर गेलेल्या सौंदर्यवतींबद्दल बोलायचं झालं तर सोनम बाजवा,नोरा फतेही,दिशा पटानी,मौनी रॉय आणि अशा अनेक जणी त्यात सामिल आहेत.यादरम्यान सोशल मीडियावर या टूरमधले अनेक व्हिडीओज व्हायरल होताना दिसत आहेत. व्हीडिओमध्ये अक्षय कुमार अमेरिकेत परफॉर्म करताना दिसत आहे.व्हायरल झालेल्या या व्हिडीओत अक्षय कुमार घागरा घालून परफॉर्म करताना नजरेस पडत आहे.अक्षय सोबत व्हिडीओमध्ये नोरा देखील दिसत आहे. दोघं स्टार एकत्र मिळून जोरदार ठुमके लगावताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत नोरा फतेही आणि अक्षय कुमार 'सेल्फी' सिनेमातील 'मै खिलाडी..तू अनाडी..' गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत.एकीकडे अक्षय कुमारचे चाहते या व्हिडीओतील त्याच्या डान्सवर फिदा झालेले दिसत आहेत आणि त्याची प्रशंसा देखील करत आहेत. पण दुसरीकडे सोशल मीडियावरील काही नेटकरी अक्षय कुमारची यावरनं खिल्ली देखील उडवताना दिसत आहेत.एका नेटकऱ्यानं अक्षयला ट्रोल करत लिहिलं आहे की, 'हेच पाहणं बाकी होतं'. तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, 'सिनेमातून पैसे मिळणं बंद झालं तर अशी कमाई सुरू आहे वाटतं'.तर कुणा एकानं म्हटलंय,'पैशांसाठी घागरा पण घातला यानं'. एवढंच नाही तर एकानं लिहिलंय,'अक्षय कुमार कधी त्याच्या वयाला शोभेल अशा भूमिका करेल,नोरा मुलगी दिसतेय त्याची'.तर एकानं कमेंट लिहिताना कहरच केला आहे. म्हणालाय, 'पोटासाठी बिचाऱ्याला नाचावं लागतंय..'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने