'प्रत्युषानं आत्महत्या केली नव्हती,त्यादिवशी..', 8 वर्षांनी अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचा खळबळजनक दावा

मुंबई:  १ एप्रिल २०१६ ला टी.व्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं आत्महत्या केली अन् अख्खी इंडस्ट्री हादरली होती. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिचा लिव्ह इन पार्टनर आणि बॉयफ्रेंड राहुल राज सिंग वर अभिनेत्रीच्या आई-वडिलांनी आरोप केला होता आणि त्याच्या विरोधात त्यांनी तक्रारही नोंदवली होती. ज्यानंतर काही दिवसांसाठी राहुल राजला जेलमध्ये देखील जावं लागलं होतं.काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राहुलनं सांगितलं की त्याचा प्रत्युषाच्या केसशी काही संबंध नाही.राहुल म्हणाला,''प्रत्युषाच्या मृत्यूच्या एक दिवस आधी दोघांनी पार्टी एन्जॉय केली होती''.यादरम्यान त्याला प्रश्न केला गेला की अखेर दोघांमध्ये असं नेमकं काय झालं होतं की ज्यामुळे प्रत्युषानं इतकं मोठं पाऊल उचललं.याचं उत्तर देताना राहुल म्हणाला की,''प्रत्युषानं आत्महत्या केली नव्हती''.राहुल राजनं दावा करत म्हटलं आहे की,''मला माहितीय तिनं आत्महत्या केली होती. पण खरतंर,त्यादिवशी प्रत्युषा मला घाबरवण्यासाठी फक्त गळफास घेतल्याचा खोटा खोटो व्हिडीओ बनवत होती. ती अनेकदा असं करायची. त्या दरम्यान तिचा पाय सटकला असेल आणि तिला बॅलन्स सांभाळता आला नसेल अन् या कारणानं ती दुःखद घटना घडली असेल''.

काही दिवसांपूर्वीच राहुल राजनं हा खुलासा केला होता की या घटनेनंतर त्याला जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यानं सांगितलं की या घटनेनंतर त्याला कोणीच काम देईना.त्यानं विकास गुप्तावर निशाणा साधत दावा केला की,त्याला 'लॉकअप १' ऑफर झाला होता,पण विकास गुप्तानं त्याचा पत्ता कट केला. विकास गुप्तामुळे माझ्या हातातून शो गेला असं राहुल राज म्हणाला होता.हाच शो नाही तर अशा कितीतरी शो मधून विकास गुप्तामुळे आपल्याला बाहेर केलं गेलं असा देखील दावा राहुल राजनं केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने