IAF ने अंधारात उतरवले विमान.... रात्रीच्या मोहिमेत IAF ने 121 भारतीयांची कशी केली सुटका?

सुदान: 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत देशांतर्गत सामना करत असलेला सुदानमधील भारतीयांची सुटका करण्यात येत आहे . भारतीय हवाई दल (IAF) आणि भारतीय नौदल (Indian Navy) यांनी आतापर्यंत 1360 नागरिकांना मायदेशी परत आणले आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने सुदानमध्ये आश्चर्यकारक बचाव कार्य केले आहे. भारतीय हवाई दलाने काल (शुक्रवारी) सुदानमधील सय्यदना आर्मी एअरपोर्टच्या रनवेवर हरक्यूलिस ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट लाइटशिवाय उतरवले. हवाई दलाच्या पथकाने या काळात एका गर्भवती महिलेसह १२१ भारतीय नागरिकांची सुटका केली आहे.

सय्यदना हे सुदानची राजधानी खार्तूमच्या उत्तरेस २२ किलोमीटर अंतरावर लष्करी विमानतळ आहे. वृत्तानुसार, या धावपट्टीवर नेव्हिगेशनसाठी कोणतीही मदत नव्हती. लाईट नव्हती. इंधनाचीही व्यवस्था नव्हती. बचाव कार्यादरम्यान हवाई दलाच्या वैमानिकांनी नाईट व्हिजन गॉगल्सचा वापर करत भारतीय नागरिकांची सुटका केली आहे.अहवालानुसार, 27/28 एप्रिल 2023 च्या रात्री केलेल्या धाडसी कामगिरी, भारतीय हवाई दलाच्या C-130J विमानाने वाडी सय्यदना येथील एका छोट्या हवाईपट्टीतून 121 जणांची सुटका करण्यात आली आहे. या लोकांना सुदान बंदरात जाण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. या ताफ्याचे नेतृत्व भारतीय संरक्षण अताचे करत होते, जो वाडी सय्यदना येथील हवाई पट्टीवर पोहोचेपर्यंत भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात होता.हवाई दलाच्या वैमानिकांनी रात्री लँडिंगसाठी नाईट व्हिजन गॉगल (NVG) वापरले. हवाई पट्टीजवळ येत असताना, लहान धावपट्टीवर कोणताही अडथळा येणार नाही याची खात्री करण्यासाठी क्रूने त्यांचे इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रा-रेड सेन्सर वापरले.धावपट्टी स्पष्ट असल्याची खात्री केल्यानंतर हवाई दलाच्या धाडसी वैमानिकांनी विमानाचे लँडिंग केले. यावेळी हवाई दलाच्या स्पेशल फोर्स युनिटच्या 8 गरुड कमांडोंनी भारतीयांची सुरक्षा केली. कमांडोंनीच सामान सुरक्षितपणे विमानात चढवले. वाडी सय्यदना आणि जेद्दाह दरम्यान अडीच तास चाललेले हे हवाई दलाचे ऑपरेशन काबूलमध्ये केलेल्या ऑपरेशनसारखेच आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने, वृत्तसंस्था पीटीआयने माहिती दिली की आमचे एकूण 754 नागरिक शुक्रवारी भारतात पोहोचले. त्यापैकी 362 बेंगळुरूला पोहोचले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले की, ऑपरेशन कावेरी अंतर्गत ३६२ भारतीय बेंगळुरूला पोहोचले आहेत. सौदी अरेबियातील जेद्दाह येथून त्यांना भारतात आणण्यात आले. तर बुधवारी 360 आणि गुरुवारी 246 भारतीयांना घरी आणण्यात आले आहे. सुदानमध्ये सुमारे 3500 भारतीय होते. त्यापैकी 1360 भारतीयांना परत आणण्यात आले आहे.सुदानमधील सत्तापालटासाठी लष्कर आणि निमलष्करी दल (RSF) यांच्यात 15 एप्रिलपासून लढाई सुरू झाली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार, या लढाईत आतापर्यंत 512 लोक आणि सैनिक मरण पावले आहेत. 4,200 लोक जखमी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने