अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, हा वेडेपणा...

मुंबई: राज्यात मुख्यमंत्री पदाच्या बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. नागपूरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांचे धाराशिवमध्ये भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.शरद पवार पत्रकार परिषदमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या मुख्यमंत्री बदलासंदर्भात विचारले. यावर त्यांनी स्वतः कोणतही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, या सुरु असलेल्या बॅनरबाजीवर अजित पवार त्यांना काय म्हणाले हे यावेळी शरद पवारांनी पत्रकारांना सांगितले.'मुख्यमंत्री बदलासंदर्भात मला काही माहिती नाही आणि जे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर अजित पवारांनी सांगितले की, हा वेडेपणा आहे. ' असं शरद पवार म्हणाले.राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होणार या चर्चेला सध्या उधाण आलं आहे. यातच अजित पवार यांची सासरवाडी म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावा मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर लावण्यात आले आहेत.शहरातील चौका चौकात तेरचे जावई ,आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आलेत. तसेच अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना साकडे घातले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने