Saif Ali Khan ने अमृता सिंगला घटस्फोट दिल्यानंतर शाहरुखचं नाव घेत केलेलं हैराण करणारं वक्तव्य.. म्हणालेला..

मुंबई: आणि करिना कपूरच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. पण अमृता सिंगपासून विभक्त झाल्यानंतरही तो काही ना काही कारणानं तिच्याशी जोडलेला आहे. सैफ-अमृतानं लग्नाच्या १३ वर्षानंतर घटस्फोट घेतला. तोपर्यंत दोघांना दोन मुले झाली होती.घटस्फोटानंतर सैफला प्रत्येक महिन्यात अमृताला १ लाख रुपये द्यायचे होते. जोपर्यंत त्यांचा मुलगा इब्राहिम १८ वर्षाचा होत नाही तोपर्यंत सैफला हे पैसे द्यायचे होते.२००४ साली सैफ अली खाननं अमृता सिंगला घटस्फोट दिला होता. त्यानंतर २००५ साली दिलेल्या एका मुलाखतीत सैफ अली खान म्हणाला होता की, ''अमृता सिंगला त्याला ५ करोड रुपये द्यायचे आहेत. ज्यामधील २.५ करोड रुपये त्यानं आधीच दिले आहेत. त्यानंतर सैफनं शाहरुखचं नाव घेत म्हटलं होतं की तो काही शाहरुख खान नाही आहे. त्याच्याजवळ एवढे पैसे नाहीत. पण जेवढे पैसे द्यायचे ठरले आहेत ते तो देणार. उरलेले पैसे तो काहीही करुन अमृताला देणार''.एवढंच नाही तर त्या मुलाखतीत सैफनं म्हटलं होतं की त्याच्याजवळ जास्त पैसे नाहीत. पण तो काहीही करून अमृताचे पैसे देऊन टाकणार. त्या दिवसांत तो जे काही सिनेमातून,जाहिरातीतून कमावत होता ते त्याच्या मुलांच्या पालनपोषणासाठी देत होता. सैफनं एका मुलाखतीत अमृता सिंगवर आरोप केला होता की ती त्याला सारा आणि इब्राहिमला भेटू देत नाही.अमृता सिंगपासून वेगळं झाल्यानंतर सैफनं काही वर्षांनी करिना कपूर सोबत लग्न केलं. दोघांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर कपूर कुटुंबाची मुलगी पटौदी खानदानची बेगम बनली. करिना-सैफला दोन मुलं आहेत..तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान. सारा आणि इब्राहिम यांचे आपल्या सावत्रं भावंडांसोबत खास बॉन्ड आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने