मुंबई: बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि काजोल हे नेहमीच त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतात. यांच्याप्रमाणेच त्यांची लाडकी मुलगी न्यासा देवगन ही देखील कायम लाईमलाईटमध्ये असते. बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी न्यासाच्या नावाचा सामावेश आहे.ती सोशल मिडियावरही खुप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही. मात्र न्यासा जितकी काहींची आवडती स्टार किड असली तरी ती बऱ्याच वेळा ट्रोलही होते. नेटकरी तिला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
न्यासाचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. त्यात ती तिच्या मित्रांसोबत पार्टी करतांना दिसते. बऱ्याच वेळा तिला तिच्या ड्रेसवरुन किंवा तिच्या चालण्यावरुन आणि तिच्या खराब हिंदी बोलण्यावरुन नेटकरी ट्रोल करतात. मात्र न्यासा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करते .ती वेळोवेळी पॅप्सच्या कॅमेऱ्यात कैद होत आहे. कालच्या दिवशीही न्यासा तिच्या मित्रांसोबत मुंबईत मस्ती करताना दिसली होती. मजेशीर गोष्ट म्हणजे या स्टार किडने त्याचे चुकीचे नाव घेतल्यावर तिने पॅप्स सुधारले.
न्यासा देवगणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये न्यासा तिच्या मित्रांसोबत कारच्या दिशेने जाताना दिसत आहे. जिथे पापाराझी तिना नायासा, न्यासा, निशा' म्हणू लागतात. आधी न्यासा शांतपणे ऐकून गाडीत बसते. पण कारचा दरवाजा बंद करण्यापूर्वी ती पापाराझीला सांगते की माझे नाव नीसा आहे. हे ऐकल्यानंतर फोटोग्राफर पुन्हा तिला त्या नावानं चिडवू लागतात.त्यावर ती हसून कारचा दरवाजा बंद करते. काजोलही अनेकदा मुलीचे नाव चुकीच्या पद्धतीने घेत असे.
अजय-काजोलची मुलगी न्यासा तिचे बेस्ट फ्रेंड ऑरी, मौनी रॉय आणि कोरिओग्राफर तुषार कालियासोबत वांद्रे येथील एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली होती. आऊटिंगसाठी न्यासा कॅज्युअल नॉटेड टॉप आणि हाय-राईज जीन्समध्ये दिसली.आता तिने स्वत: नाव सांगत अनेकांचे गैरसमज दूर केले आहेत. तिचं बदलेलं रुप पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ती पूर्वीपेक्षा खूप सुंदर झाली आहे. नीसा सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही मोठ्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात.