SCच्या चुकीमुळे ९८ कोटींचा घोटाळा; सरन्यायाधिशांना कळताच, बदलला निर्णय...

नवी दिल्ली:  सुप्रीम कोर्टाच्या चुकीच्या निर्णयामुळे ९८ कोटींची रक्कम ज्याच्याकडे जाणे अपेक्षित नव्हते, ती अशा व्यक्तीच्या हातात गेली, मात्र जेव्हा सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा मानून तो बदलला.ज्या दोन लोकांकडे ही रक्कम गेली होती, त्या दोघांना ती रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले. इतकंच नाही तर दोन्ही व्यक्ती व्याजाच्या रकमेसह हे पैसे सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करतील, असं सरन्यायाधीशांनी आपल्या निर्णयात म्हटलं आहे.सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय बदलला होता आणि म्हटले होते की, ज्या आदेशात दोन जणांना ९८ कोटी रुपये देण्यात आले ते आदेश चुकीचे होते, असे आम्ही मानत आहोत. आता आपण स्वतःची चूक सुधारत आहोत. तो निर्णय फेटाळला जातो.भारताच्या सरन्यायाधीशांनी अॅक्टस क्यूरी नेमिनेम ग्रावाबिटचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय बदलला. ग्रावाबिटच्या वापरासाठी हे योग्य प्रकरण आहे, असं वाटत असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटले होते. ज्या प्रकरणांमध्ये न्यायालयाकडूनच चूक झाली असेल अशा प्रकरणांमध्ये ग्रावाबिट लागू होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने