पठाणनंतर किंग खानच्या 'डंकी'चा डंका!

मुंबई: बॉलीवूडचा किंग खानच्या पठाणनं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. पठाणवरुन साऱ्या देशभरात वाद सुरु झाला असताना तो चित्रपट चालेल की नाही याविषयी शंका होती. पण दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम यांच्या भूमिका असलेल्या पठाणनं प्रेक्षकांना वेड लावलं. यानंतर शाहरुखच्या नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.खरतरं शाहरुखनं गेल्याच वर्षी प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डंकीचं शुट पूर्ण केलं होतं. मात्र तो चित्रपट बऱ्याच अडचणींमध्ये फसला त्यामुळे त्याच्या रिलिज तारखांचा घोळ झाल्याची माहिती समोर आली. यातच शाहरुखचा पठाण बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर पडला होता. त्यामुळे डंकीकडे फारसे लक्ष गेले नाही. आता डंकीचा फर्स्ट लूक समोर आला असून त्याला नेहमीप्रमाणे चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.आखाती देशांमध्ये शाहरुखच्या डंकीचे चित्रिकरण झाले असून शाहरुखच्या या चित्रपटाविषयी चाहत्यांना मोठी उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे. शाहरुखनं त्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ग्रीन टी शर्ट, फंकी वॉच आणि खांद्यावर बॅग अशा वेशभूषेमध्ये फोटो शेयर केला आहे. त्यात तो दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत बोलताना दिसतो आहे. जिओनं गेल्या वर्षी शंभर चित्रपटांची घोषणा केली असून त्यातील काही चित्रपट आता प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगण्यात आले आहे.शाहरुखचा हा महत्वपूर्ण चित्रपट येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय लोकं जी बेकायदेशीररित्या अमेरिका आणि कॅनडामध्ये जातात त्यानंतर होणाऱ्या वेगवेगळ्या परिणांविषयी डंकी भाष्य करतो असेही सांगण्यात आले आहे. यात शाहरुखसोबत प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नु देखील दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने