'राजाराम'च्या निवडणुकीत महादेव महाडिकांचा दणदणीत विजयी; 'यांना' दिलं श्रेय

कोल्हापूर: राजाराम साखर कारखाना निवडणूकीत महादेवराव महाडिक यांनी दमदार वियज मिळवला आहे. या यांच्या विजयानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या विजयानंतर कोल्हापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.या दणदणीत विजयानंतर महादेवराव महाडिक म्हणाले की, राजराम कारखान्याच्या निवडणूकीतील विजय हा कारखान्याच्या सर्वसामान्य सभासदांचा विजय आहे. प्रामाणिक राहिलेल्या सर्वांचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. या विजयाचं सर्व श्रेय मी अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांना देतो असेही महादेवराव महाडिक यावेळी म्हणाले. आजचा विजयमुळे कोल्हापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळणार असून जिल्ह्याचं राजकारण यामुळे बदलणार आहे असेही त्यांनी सांगितले.महाडिकांकडे असलेली ताकद ही गोरगरीब जनतेची आहे. धनंजय महाडिक अमल महाडिक यांना पहिले सलामी द्या, मग बाकीचं पुढंच पुढं पाहू. ज्याला शड्डू मारायला येत नाही, त्याला शड्डू मारायला शिकवत आहेत. मी फूकून उडवून टाकेन, असा इशाराही महादेव महाडिक यांनी विरोधकांना दिला आहे.दरम्यान संस्था गटातून महादेवराव महाडिक 39 मतानं विजयी झाले आहेत, तर विरोधी गटाचे सचिन पाटील यांना केवळ 44 मतं मिळाली आहेत. या निवडणुकीत 5 फेरी अखेर महाडिकांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. याचबरोबर संस्था कडातून महादेवराव महाडिक यांनी 84 मतं मिळवत आपला विजय निश्चित केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने