'देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री', नागपूरमध्ये झळकले बॅनर; फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे...

बंगळूरुः कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी वृत्तवाहिनीली मुलाखत देतांना नागपूरच्या बॅनर प्रकरणावर भाष्य केलं आहे.देवेंद्र फडणवीस यांना नागपूरमधील बॅनरवरुन विचारण्यात आलं. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, ज्या कोणी ते बॅनर लावले आहेत ते त्यांनी काढून टाकावेत. अतिउत्साही लोकं असतात, तेच असं करतात. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. २०२४ मध्ये तेच मुख्यमंत्री होतील. त्यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवू, असं फडणवीस म्हणाले.कर्नाटक निवडणुकीच्या अनुषंगाने बोलतांना ते म्हणाले की, कर्नाटकमध्ये भाजपला बहुमत मिळेल. मोदींच्या कामामुळे कर्नाटकसह संपूर्ण देशात त्यांचा प्रभाव आहे. आपले मुख्यमंत्री मोदीजींसोबत काम करत आहेत, हे कर्नाटकच्या जनतेला चांगलं माहिती आहे. कर्नाटकात पु्न्हा डबल इंजिनचं सरकार काम करेल,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'टीव्ही 9 मराठी' शी बोलतांना त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला.काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

  • नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले

  • ज्या कोणी लावले त्यांनी काढून टाकावेत, मुर्खपणा करु नये

  • अतिउत्साही लोकं असतात, तेच असं करतात

  • एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, २०२४ मध्ये तेच मुख्यमंत्री असतील

  • त्यांच्याच नेतृत्वात आम्ही विधानसभा निवडणूक लढवू

  • कर्नाटकमध्ये भाजपला संपूर्ण बहुमत मिळेल

  • मोदीजींचा प्रभाव संपूर्ण देशात आहे

  • आपले मुख्यमंत्री मोदीजींसोबत काम करतायत, हे लोकांना माहिती आहे

  • डबल इंजिनचं सरकार येथे पुन्हा चांगलं काम करेल

  • भाजपने वेळोवेळी एक्झिट पोलचे आकडे खोटे ठरवलेले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने