गांगुली-विराट वाद चव्हाट्यावर; कोहलीच्या 'या' निर्णयाने क्रिकेट विश्वात खळबळ

मुंबई : विराट कोहली आणि सौरव गांगुली. भारतीय क्रिकेटचे दोन मोठे दिग्गज आणि दोन माजी कर्णधार. मात्र या दोन दिग्गजांमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेला वाद जगापासून कधीच लपून राहिलेला नाही. अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ दिल्ली कॅपिटल्सशी भिडला होता. त्या सामन्यात विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा समोर आला.सामन्यानंतर विराट कोहलीने सर्वांशी हस्तांदोलन केले पण दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुलीकडे दुर्लक्ष केले. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यानंतर गांगुली आणि विराटमधील कर्णधार वादाची चर्चा पुन्हा एकदा चर्चेत आली. पण आता विराटने असे काही केले आहे ज्यामुळे हे दोन खेळाडू पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.आता हँडशेक प्रकरणानंतर विराट कोहलीने सौरव गांगुलीला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचे वृत्त येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार याआधी विराट सौरव गांगुलीला इन्स्टाग्रामवर फॉलो करत होता. मात्र आता या खेळाडूने दादांना त्यांच्या फॉलोलिस्टमधून काढून टाकले आहे.नुकत्याच झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 33 चेंडूत 50 धावा केल्या. तो या सामन्यात खूपच आक्रमक दिसत होता. यानंतर क्षेत्ररक्षणातही तो मोठ्या उर्जेने मैदानात उतरला. आरसीबीच्या गोलंदाजीदरम्यान त्याने सीमारेषेवर अमन खानचा झेल घेताना दिल्ली कॅपिटल्सच्या डगआऊटमध्ये बसलेले मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांच्याकडे पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने