नाव भाजपचं पण खरं लक्ष्य काँग्रेस, सचिन पायलटांच्या उपोषणामागं काय घडतंय?

राजस्थान: राजस्थानात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झालीये, त्यामुळं पक्षातील अंतर्गत वाद पुन्‍हा एकदा चव्‍हाट्यावर आलाय.2018 च्या विधानसभा निवडणुकीपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत  यांच्यावर नाराज असलेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी पुन्‍हा आक्रमक भूमिका घेतली आहे. जयपूरमधील हुतात्मा स्मारकावर पायलट  यांनी लाक्षणिक उपोषण सुरु केलंय.मात्र, पायलट यांच्या उपोषणावर काँग्रेसनं टीका केली आहे. राजस्थानचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी पायलट यांना पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप केलाय. दरम्यान, सचिन पायलट यांनी आज (मंगळवार) जयपूर येथील हुतात्मा स्मारकावर उपोषणाला सुरूवात केली.व्यासपीठावर गांधीजींचा फोटो लावण्यात आला असून राष्ट्रपितांचं आवडतं भजन ‘वैष्णव जन तो…’ वाजवले जात आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी पायलट यांनी ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली. तसंच वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचारावर कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. आज सायंकाळी 5 नंतर ते माध्यमांशी बोलणार असल्याचं कळतंय.राजस्थान प्रदेश काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर रंधावा यांनी सचिन पायलट यांच्याशी फोनवर चर्चा केली असून त्यांनी पक्षाच्या मंचावर आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलंय. तसंच दिल्लीतील पक्ष नेतृत्वानंही यावर विचारमंथन सुरू केलं आहे. निवडणुकीपूर्वी गेहलोत यांच्या विरोधात नवी आघाडी उघडत पायलट हायकमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. पायलट यांनी यापूर्वीही त्यांच्याच सरकारविरोधात बंड केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने