तेंडुलकर, कोहली काही बोलतील का…; ब्रिजभूषण सिंह प्रकरणी राष्ट्रवादी नेत्याचं ट्वीट

दिल्ली: भाजप खासदार आणि ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केले आहेत.बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाईसाठी दिल्लीत खेळाडू आंदोलन करत आहेत. त्यांना क्रिडा जगतातील अनेक खेळाडूंकडून पाठिंबा मिळत आहे.अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा हे आणखी दोन ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर मुलींच्या लैंगिक छळवणूक विरोधातील आंदोलनात आज रस्त्यावर उतरले आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली या दिग्गज क्रिकेटपटूंच्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित केला आहे.जितेंद्र आव्हाडांनी याबद्दल ट्वीट केलं आहे. अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा हे आणखी दोन ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर मुलींच्या लैंगिक छळवणूक विरोधातील आंदोलनात आज रस्त्यावर उतरले. पण सरकार खा. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करायला तयार नाही.तेंडुलकर, कोहली काही बोलतात का पाहू? सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आत्ताच बातमी आली . कपिलदेव ह्या भगिनीन साठी उभा राहिला.रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी देशातील दिग्गज कुस्तीपटू दिल्लीत धरणे दिले आहे. त्यांच्या या लढ्याला अनेक राजकीय पक्षांकडूनही पाठिंबा मिळत आहे, मात्र आतापर्यंत त्यांच्या समर्थनार्थ दुसरा कोणीही खेळाडू पुढे आला नाही. यावर आता विनेश फोगट यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. विनेशने भारतीय क्रिकेटपटू आणि इतर आघाडीच्या खेळाडूंच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. संपूर्ण देश क्रिकेटची पूजा करतो, मात्र एकाही क्रिकेटरने या प्रकरणावर भाष्य केलं नाहीये असे ती म्हणाली आहे.

निरज चोप्रा काय म्हणाला?

आता कुस्तीपटूंना ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राची देखील साथ मिळाली आहे. नीरज चोप्राने पैलवानांच्या समर्थनार्थ ट्विट केले की, तो म्हणाला की, "ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. आमच्या खेळाडूंना रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करताना पाहून मला वेदना होत आहेत. त्यांनी आमच्या महान राष्ट्राचे प्रतिनिधित्व करून आम्हाला अभिमान वाटावा यासाठी खूप चांगले काम केले आहे.""एक राष्ट्र म्हणून प्रत्येक माणसाची अखंडता आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. जे घडत आहे ते कधीच घडू नये. हा एक संवेदनशील मुद्दा आहे आणि तो निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने हाताळला गेला पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने