बनावट औषधं बनवणाऱ्या 18 फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द, DCGI ची मोठी कारवाई

मुंबई: ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं बनावट औषधं बनवणाऱ्या 18 फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत.एएनआयनं आज (गुरुवार) सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की, डीसीजीआयनं 20 राज्यांतील 76 कंपन्यांची तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेतला.



अधिकृत सूत्रांकडून सांगितलं की, DCGI नं बनावट औषधं बनवणाऱ्या कंपन्यांविरुध्द मोहीम सुरु केली आहे. यात हिमाचल प्रदेशातील 70, उत्तराखंडमधील 45 आणि मध्य प्रदेशातील 23 कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली, त्यापैकी बहुतांश उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील आहेत. हिमालया मेडिटेक प्रायव्हेट लिमिटेडचा 30 डिसेंबर 2022 पासून उत्पादन करण्याचा परवाना निलंबित करण्यात आला आणि यावर्षी 7 फेब्रुवारी रोजी 12 उत्पादनं तयार करण्याची परवानगीही रद्द करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने