अवजड मालवाहतुकीतील २५ टक्के वाहने घटली

कोल्हापूर: दहावी, बारावी, पदवीनंतर नोकरी नाही म्हणून कर्ज काढून पहिल्यांदा मालवाहतुकीचा टेम्पो घेतला. चिकाटीने व्यवसाय केला. पुढे टेम्पो विकून ट्रक घेतला. दोनाचे चार ट्रक घेतले. वर्षानुवर्षे समस्या, संकटे मागे टाकून उभारलेला अवजड माल वाहतूक व्यवसाय सध्या विचित्र संकटात सापडल्याने व्यवसाय वाढीला खीळ बसली. कोरोना नंतरच्या काळात अवजड माल वाहतुकीच्या गाड्यांची संख्या २५ टक्क्यांनी घटली आहे.गेल्या दहा वर्षांत इंधन दरात झालेली ३७ टक्के भाववाढ, ट्रकमध्ये भरलेल्या मालाची हमाली ट्रक मालकाने देण्याची पद्धत, कोरोना काळातील बंद, अपघात, खराब रस्त्यांमुळे गाडीची सतत निघणारे दुरस्ती काम, राज्य व महामार्गावरील दंड वसुली, टायरच्या वाढलेल्या किमती यामुळे एक-दोन ट्रक घेऊन नव्याने व्यवसाय सुरू करणे जिकरीचे बनले आहे. जुन्या व्यवसाय कसा बसा टिकवण्यावर सध्या व्यावसायिकांचा भर आहे. कोरोनाकाळात ज्यांच्या गाड्या थांबून होत्या त्यापैकी कर्जाचे हप्ते जास्त थकल्याने वित्तीय संस्थांनी गाड्या ओढून नेल्या या अशा कारणात मालवाहतूक व्यवसायाला खीळ बसली आहे.



दृष्टिक्षेपात व्यवसाय

  • जिल्ह्यात मालवाहतुकीची वाहने - १५ हजार

  • नियमित माल वाहतूक करणारी - १० हजार

  • दिवसाकाठीची उलाढाल - ३५ ते ५० लाख

  • जिल्ह्याअंर्तगत माल वाहतूक करणारी - ५०० वाहने

  • राज्यभरातील माल वाहतूक वाहने - १५००

  • परप्रांतात वाहतुकी करणारी वाहने - २ हजार ८००

  • माल वाहतुकीवर अवलंबून असलेले घटक - ५० ते ७५ हजार

माल वाहतूकदारांना मार्गावर गाडी काढली किंवा गाडी थांबवून ठेवली तरी खर्च करावाच लागतो. अपेक्षित भाडे मिळाले नाही किंवा गाडी बंद राहिली तरी बॅंकाचे हप्ते भरावे लागतात; अन्यथा गाडी ओढून नेली जाते. ऐनवेळी पैसे उभे करणे मुश्कील होते. यात पंधरा वर्षे झालेल्या गाड्या वापराबाहेर काढण्याची शासनाची अट आहे. त्यामुळे नवीन गाडी घेऊन व्यवसाय सुरू करणाऱ्याची संख्या कमी झाली. ज्यांच्या जुन्या गाड्या आहेत त्यांचा व्यवसाय कसाबसा सुरू आहे.

बंदस्थितीतील वाहने

  • पाच वर्षांत वित्तीय संस्थांनी ओढून नेलेली वाहने - १५००

  • व्यावसायिक अडचणीमुळे ‘जैसे थे’ अवस्थेतील वाहने - २०००

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने